इंदापूर : भुजबळांची मंत्रीपदावर वर्णी लागताच दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांनी एकहाती सत्त राखत निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) यांचे मंत्रिमंडळात पुन्हा येणं उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) लाभदायक ठरलं असून, पहिल्याच दिवशी विजयाची बातमी मिळाली आहे. इंदापुरातील या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. अखेर पुन्हा एकदा या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या लढतीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलने श्री छत्रपती बचाव पॅनलचा सुपडा साफ झाला आहे.
भुजबळ राज्याच्या राजकारणातील ट्रम्प कार्ड?, मंत्री बनल्याने पवारांसह फडणवीसांना मिळणार ५ फायदे
कोणाला किती मते ?
गट क्रमांक एक लासुर्णेमधून श्री जय भवानी माता पॅनेलचे पृथ्वीराज जाचक यांना 11694 मते मिळाली आहेत. तर शरद जामदार 10529 मते मिळाली आहेत. तर श्री छत्रपती बचाव पॅनलचे संजय निंबाळकर यांना 4850 तर प्रताप पवार यांना 4197 मते मिळाली आहेत. गट क्रमांक दोन सणसरमध्ये श्री जय भवानी माता पॅनेलचे रामचंद्र निंबाळकर यांना 10929 मते मिळाली. तर शिवाजी निंबाळकर यांना 10431 मते मिळाली. विरोधी संग्राम निंबाळकर यांना 5165 मते मिळाली तर महादेव शिरसाट यांना 3957 मते मिळाली.
तर, उद्धव गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांना 9672 मते मिळाली आहे. गणपत सोपान कदम यांना 9297 मते मिळाली. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप हे श्री छत्रपती बचाव पॅनल मधून मैदानात होते त्यांना 6961 मते मिळाली आहेत. तर भाजपचे नेते तानाजीराव थोरात यांना 4721 मते मिळाली आहेत.
अंथुर्णे गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार प्रशांत दासा दराडे यांना 11180 मते मिळाली आहेत तर, अजित नरुटे यांना 11 हजार 90 मते मिळाली आहेत. विरोधी पॅनलचे श्री छत्रपती बचाव मधून मैदानात असलेले बाबासाहेब झगडे यांना 4940 मते तर राजेंद्र पाटील यांना 4860 मते मिळाली आहेत. गट क्रमांक पाच सोनगाव मधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार अनिल सिताराम काटे यांना 11 हजार 789 मते मिळाली आहेत तर, बाळासाहेब कोळेकर यांना 11,768 मते मिळाले आहेत. संतोष मासाळ यांना 10 हजार तीनशे सात मते मिळाली आहेत.याच गटात विरोधी असलेले श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार रवींद्र टकले यांना 5482 मते मिळाली आहेत.
जहाँ नहीं चैना ते कॅबिनेट; भुजबळांच्या कमबॅकचं ‘हिडन सिक्रेट’; समीकरण अन् राजकारण नेमकं कसं?
गुणवडी गटामध्ये श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार कैलास गावडे यांना 11832 मते मिळाली. तर निलेश टिळेकर यांना 11,563 मते आणि सतीश देवकाते यांना 11,261 मते मिळाले आहेत तर विरोधी असणारे नितीन काटे यांना 5434 मते मिळाले आहेत. इतर मागास प्रवर्गामधून उभे असलेले श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार तानाजी शिंदे यांना 11358 मते मिळाली तर, विरोधी असलेले संदीप बनकर यांना 5166 मते मिळाली.
भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार योगेश पाटील यांना 11843 मते मिळाली. तर योगेश पाटील यांना पाठिंबा दिलेले उमेदवार तुकाराम काळे यांना 4172 मते मिळाली.अनुसूचित जाती जमातीमधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार मंथन कांबळे यांना 11,511 मते मिळाली तर, विरोधी असणारे बाळासाहेब कांबळे यांना 4961 मते पडली असून ब वर्गातून अशोक संभाजी पाटील यांना 260 मध्ये तर, त्यांना पाठिंबा दिलेल्या सत्यजित भाऊसाहेब सपकळ यांना 16 मध्ये मिळाली आहेत.