पुणे : गेल्या महिन्याभरापासून पुण्यात दोन निवडणुका या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. (Chinchwad Bypoll Election Result 2023) कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने- सामने उभे ठाकले होते. (Chinchwad Bypoll Election) दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने पक्षाने उमेदवारी दिली. निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे नाना काटेंना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक झाली. यासंदर्भात आज मतमोजणीच्या दिवशी अश्विनी जगताप (ashwini jagtap) यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नसल्याची प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली आहे. आज साहेबांची खूप आठवण येतेय. निकालाकडे बघितलं तर फार उत्साह नाही. पण लोकांना न्याय द्यावा, त्यांच्या पाठीवर हात फिरवणारं कुणीतरी आपलं असावं, त्यांची कामं वेळच्यावेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणारं कुणीतरी असावं यासाठी खरंतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले. ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे. भाजपाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे येऊन मला पाठिंबा दिला आहे, सभा घेतले आहेत. भाजपाचे संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते आले होते. त्यांना मी धन्यवाद देईन”, असं अश्विनी जगताप यावेळी म्हणाले.
Chinchwad By Election : कलाटेंनी काटेंची ‘शिट्टी’ वाजवली, तर अश्विनी जगतापांची विजयाकडे वाटचाल…
नवव्या फेरीअखेर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत, तर नाना काटे याना 25205 मत आहेत, तर राहुल कलाटे याना 9945 मत मिळाली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. भाजप उमेदवार जगताप या सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, या मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. कलाटे यांना तिकीट नाकारल्याने ते अपक्ष म्हणून उभे राहिले. या बंडखोरीचा फायदा भाजपला मिळताना दिसत आहे. दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.