Download App

Assembly Election: इव्हीएमची माहिती प्रशासनाकडून मिळेना; राहुल कलाटे यांची थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

  • Written By: Last Updated:

Chinchwad Assembly Constituency: पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार लढत होईल, अशी लढत होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे इमेलद्वारे तक्रार केलीय. पुणे जिल्हा निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे इव्हीएमबाबत माहिती दिली जात नसल्याची तक्रार कलाटी यांची आहे.

चिंचवडच्या शाश्वत विकासाचे ‘अभिवचन’! राहुल कलाटे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध, सुप्रिया सुळेंच्या हस्ते प्रकाशन

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी निवडणूक शाखेकडे इव्हीएमची माहिती मागितली होती. परंतु निवडणूक कार्यालयातून इव्हीएमची माहिती पुरविली जात नाही. त्यामुळे निर्भय आणि निष्पक्षपणे निवडणूक होणार का अशी शंका मनात उपस्थित होत आहे, असे कलाटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

भोसरी अन् चिंचवड शरद पवारांच्या वाट्याला; गव्हाणे, राहुल कलाटेंना उमेदवारी जाहीर…

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कंट्रोल युनिटचे युनिक नंबरचे रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे. तसेच पिंक पेपरच्या सीलचे क्रमांक आणि त्यावर उमेदवारांची सही असणे आवश्यक आहे. त्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य पक्षांच्या उमेदवारांना बॅलेट युनिटचे क्रमांक, कंट्रोल युनिटचे क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ही प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. परंतु प्रशासनाकडून ही प्रक्रिया पार पाडून एव्हीएमची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियाबाबत मनात शंका निर्माण झाली असल्याचे कलाटे यांनी इमेलमध्ये म्हटले आहे. कलाटे यांनी आजची ही तक्रार केलीय. त्यावर आयोगाचे उत्तर आल्यानंतर कलाटे यांची तक्राराची काय होते हे समजणार आहे.

follow us