Download App

Chinchwad Election Live : तब्बल 27 हजार मतांनी अश्विनी जगताप आघाडीवर तर नाना काटे…

पुणे : कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. यातच कसब्यातून भाजपच्या हेमंत रासने याला मात देत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. तर चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी तब्बल 27 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना कलाटे चांगलेच पिछाडीवर पडले आहे. तिसाव्या राऊंडचे कल हाती आले असून यामध्ये अश्विनी जगताप यांना (Ashwini Jagtap ) 112113, नाना काटे (Nana Kate) 84384 तर राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना 38900 एवढे मत मिळाली आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना 72 हजार 599 मते मिळाली तर हेमंत रासने यांना 61 हजार 771 मते मिळाली. तर चिंचवड निवडणुकीत सुरुवातीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा चांगलाच फटका बसला आहे.

कोणता IPO घ्याल ?, नफा मिळेल का ? ; फायदेशीर आयपीओसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

दरम्यान कसबा व चिंचवड निवडणुका सुरुवातीपासूनच भाजप व महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या बनवल्या होत्या. यातच भाजपचा बालेकिल्ला असलेला कसब्यात काँग्रेसने सुरुंग लावला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे रासने यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला आहे. तर दुसरीकडे चिंचवड मध्ये अद्यापही मतमोजणी सुरूच आहे.

Kasba By Election : ‘चिंचवडही जिंकलं असतं पण…’ ‘राहुल कलाटेंवर अजित पवार म्हणाले

चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना मोठी आघाडी आतापर्यंत मिळाली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. जगताप यांना 1 लाख 12 हजार 113 मते तर नाना काटे यांना 84 हजाराहून अधिक मात्र मिळाली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना जवळपास 39 हजार मते मिळाली आहे.

Tags

follow us