Download App

आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसानी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची का? CM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केला तर पोलीसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायच्या का, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde : बदलापूर प्रकरणातील (Badlapur Encounter आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूवरून विरोधकांकडून महायुती सरकावर टीका केली जाते. दरम्यान, आता विरोधकांच्या टीकेला टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंद (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं. आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केला तर पोलीसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायच्या का, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

‘लेबनॉन अन् गाझातील हल्ले तत्काळ थांबवा’; चीनने इस्त्रायलला घेरलं 

पुणे मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन झालं. खरं तर हा पुणे मेट्रोचा कार्यक्रम गुरुवारी होणार होता. मात्र पावसामुळे उद्घाटन होऊ शकले नाही. सगळी तयारी होती. पण लोकांना त्रास होऊ होईल म्हणून पंतप्रधानांनी स्वतः कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यामुळं संवेदनशील पंतप्रधान कसे असतात, हे त्यांनी दाखवून दिलं, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

मोठी बातमी! मल्लिकार्जुन खरगेंची तब्येत बिघडली, भाषण करताना आली भोवळ 

पुढं बोलतांना शिंदे म्हणाले की, या मेट्रो लाईनचे उद्घाटन केलं असतं तरी विरोधकांनी म्हटलं असतं की लोकांना त्रास झाल, उद्घाटन नाही केलं तर म्हणतात विलंब झाला. म्हणजे विरोधक दोन्हीकडूनही बोलतात, अशी परिस्थिती आहे. विरोधकांकडून दोन्हीकडून वाजण्याचे प्रकार सुरू आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूरच्या घटनेनंतर विरोधक आरोपींना फाशी द्या असे म्हणत आहेत. त्यानंतर आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी बंदुक शोकेसमध्ये ठेवायची का? पोलिसांनी समजा ते केलं नसतं तर विरोधकच म्हणाले असते की, चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला. मग पोलिसांची बंदूक काय शोसाठी ठेवली का? म्हणजे विरोधक इकडून पण बोलतात, तिकडूनही बोलतात, त्यांनी दोन्ही बाजूंनी बोलायची सवयच आहे, असं सीएम शिंदे म्हणाले.

follow us