Download App

Pune LokSabha : तिकीट मिळाल्यास खासदारकीलाही गुलाल उधळणार! धंगेकरांचा शड्डू

Image Credit: Letsupp

Ravindra Dhangekar On Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघाची (Pune Loksabha) पोट निवडणूक लवकर घेण्याबाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोणत्याही क्षणी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसबा पेठ मतदारसंघातून बाजी मारलेले महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) मला पक्षाकडून तिकीट मिळाल्यास खासदारकीलाही गुलाल उधळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. धंगेकरांनी लेट्सअपशी संवाद साधला. यावेळी बोलताना रविंद्र धंगेकरांनी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी शड्डूच ठोकला आहे.

अंतरवली सराटीतील दगडफेक प्रकरणी ऋषिकेश बेद्रेला जामीन मंजूर, जालना आणि बीडमध्ये नो एंट्री

रविंद्र धंगेकर म्हणाले, पुणे पोटनिवडणूक व्हायला हवी होती. आज पुणे शहराला खासदार नाही, यंत्रणा सगळी भाजपच्या ताब्यात आहे. प्रशासनावर पूर्णपणे भाजपचाच अंकुश आहे. त्यामुळेचं कोर्टाला ताशेरे ओढावे लागले आहेत. पुणे पोट निवडणूक प्रकरणी जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी रविंद्र धंगेकरांनी केली आहे.

Vaibhav Naik : ‘व्हायरल क्लिप’चा वाद वाढला! विधिमंडळ परिसरातच भातखळकर-नाईकांत जुंपली

मी पुणेकर…आता खासदारही होईल :
काँग्रेमध्ये अनेक वरिष्ठ नेते आहेत. ते काम करत आहेत. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनाही रस असेल. जर पक्षाने मला तिकीट दिलं तर माझी सुरुवात इथूनच होईल. गरीबाचा पोरगा नगरसेवक होता, आता आमदार झाला, गरीबाचा पोरगा आता खासदारही होईल, मी पुणेकर आहे, आपण जिंकण्यासाठीच निवडणूका लढवतो हारण्यासाठी नसल्याचं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात नोकरीची संधी, १२ वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज, महिन्याला 37 हजार रुपये पगार

पुण्यातील अनेक प्रश्न आहेत, वाहतूक पाणी, बांधकामे याची प्रशासनाची जबाबदारी आहे. लोकशाही टिकणार की नाही हाचं प्रश्न आहे. लोकशाही असते तर महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूका झाल्या असत्या, असंही ते म्हणाले आहेत. आता मुदत संपायला कमी वेळ आहे. त्यामुळे आता निवडणूक होणार नाही. जेव्हा घ्यायची होती तेव्हा घेतली नाही. प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी पाहिजे. प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरु आहे. प्रशासनावर भाजपचा अंकूश असल्याचा आरोपही धंगेकरांनी केला आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर पोटनिवडणुकीबाबत हालचाली सुरु झाल्याचं दिसून आलं. गिरीश बापट यांच्याआधी अनिल शिरोळे या मतदारसंघाचे खासदार होते त्यानंतर गिरीश बापटांना संधी देण्यात आली होती. आता गिरीश बापट यांच्यानंतर भाजपकडून कोणाला संधी मिळणार? याची चर्चा रंगली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज