होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात नोकरीची संधी, १२ वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज, महिन्याला 37 हजार रुपये पगार
HBCSE Bharti 2023: आज अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं महाकठीण काम आहे. त्यामुळं पात्रता असूनही बरेचजण खाजगी नोकरी करतांना दिसतात. दरम्यान, तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा मूलभूत अनुसंधान (Tata Basic Research) यांच्या अंतर्गत येणाऱ्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (Homi Bhabha Science Education Centre) मुंबईने प्रकल्प सहाय्यक (Project Assistant), प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक-B, तांत्रिक प्रशिक्षणार्थी (नागरी ) पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
संसदेत सर्वसामान्यांना प्रवेश मिळतो का? कामकाज पाहण्यासाठी पास कसा मिळतो?
या भरतीसाठी, पदांनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 19, 21 डिसेंबर 2023 आणि 4 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. होमी भाभा विज्ञान अध्यापन केंद्र मुंबई भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याविषयी माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – पदाचे नाव- प्रकल्प सहायक, प्रकल्प प्रयोगशाळा सहायक- बी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी (नागरी)
एकूण पदांची संख्या – 3
प्रकल्प सहाय्यक – 01 जागा
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक-बी – 01 जागा
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) – 01 पदे
शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प सहाय्यक: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक – B: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल): सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा.
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
Photos : मोहन यादवांच्या शपथविधीला शिंदे-फडणवीस अन् पवार भोपाळला; पाहा फोटो
वयोमर्यादा –
प्रकल्प सहाय्यक – 33 वर्षे
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक – बी – 28 वर्षे
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) – 28 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता –
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टीआयएफआर, मानखुर्द, मुंबई
मुलाखतीची तारीख – 19, 21 डिसेंबर 2023 आणि 4 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ
https://hbcse.tifr.res.in/
पगार –
प्रकल्प सहाय्यक- 37 हजार 700 रु.
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक-ब- रु. 37 हजार 700.
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (नागरी) – 23 हजार रुपये.
जाहिरात
https://drive.google.com/file/d/1O2Yl5m4aooZxE44ROw89VufY3dJ0JKBf/view
मुलाखत प्रक्रिया: मुलाखतीला उपस्थित राहतांना सूचना काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. याशिवाय अधिसूचनेत दिलेला अर्ज भरून आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. वरील तारखेला सकाळी 09.00 ते 10.30 या वेळेत मुलाखती घेण्यात येतील.