Download App

Rahul Gandhi : “मतदान चोर, खुर्ची सोड” – काँग्रेस पक्षाचा शहरात मशाल मोर्चा

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये मोठ्या

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले घोटाळे देशासमोर उघड केले आहेत. भारतीय जनता पक्षाने (BJP) निवडणूक आयोगावर दबाव टाकून, निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्यांमध्ये फेरफार करून, मतचोरीच्या माध्यमातून गैरमार्गाने सत्ता मिळवण्याचा आरोप काँग्रेस (Congress) पक्षाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी शहरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चाची सुरुवात शगुन चौक येथून होऊन रिव्हर रोड मार्गे भाटनगर येथे समारोप करण्यात आला. हा मोर्चा प्रदेश कॉंग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, हा प्रकार केवळ राजकीय प्रश्न नसून, सामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणारा आहे. लोकशाहीत मतदारांचा निर्णय सर्वोच्च मानला जातो. मात्र, सध्याच्या सरकारने मतदारांचा अपमान करून सत्ता मिळविल्याने ते लोकनियुक्त सरकारच नाही, हे सर्वसामान्य जनतेलाही लक्षात आले आहे. काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत असून, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.

यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, लोकशाहीचा गळा घोटून मिळवलेली सत्ता देश मान्य करणार नाही. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असून, प्रत्येक पातळीवर मतदारांचा सन्मान व न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देत राहील.

या मशाल मोर्चात शहर काँग्रेसचे बाबू नायर, अमर नाणेकर, भाऊसाहेब मूगुटमल, मयूर जयस्वाल, ॲड. अनिरुध्द कांबळे, बाबासाहेब बनसोडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, दाहर मुजावर, वाहब भाई शेख, चंद्रकांत लोंढे, महेश पाटील, गौरव चौधरी, प्रा. किरण खाजेकर, सोमनाथ शेळके, अबूबकर लांडगे, डॉ. मनिषा गरुड, शितल कोतवाल, जनदबी सय्यद, आशा भोसले, सीमा यादव, भारती घाग, आशा बोरकर, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, मुन्साफ खान, उमेश बनसोडे, राहुल शिंपले, रशिद अत्तार, मजहर खान, वसंत वावरे, मिलिंद फडतरे, बाबूलाल वाघमारे, दीपक भंडारी, ॲड. अनिकेत रसाळ, सतीश भोसले, आण्णा कसबे, सुरज कोथींबीरे, बाबासाहेब पाटील आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

follow us