Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आयएएस झाल्या आहेत. यासाठी त्यांनी आठ लाख रुपये उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. परंतु, पूजा खेडकर हिचे वडील निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी लोकसभा निवडणूक लढवताना 40 कोटींची संपत्ती दाखवली होती. त्यामुळे नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र संशयाच्या फेऱ्यात अडकलं आहे. यावर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपने विणलेलं भीतीचं अन् संभ्रमाचं जाळं तुटलं; पोटनिवडणुकांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट
दिलीप खेडकर यांना पूजाने युपीएससीसाठी क्रिमी लेयर की नॉन-क्रिमी लेयरमधून अर्ज केला होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दिलीप खेडकर म्हणाले, यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीसमोर आम्ही आमचे म्हणणे मांडू. कायदेशीर प्रक्रिया सुरू असेल तर त्यावर बोलणं योग्य नाही. आम्ही सर्व काही नियमानुसार केलं आहे. यात गैर काहीच नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘माझ्या मुलीने कोणतीही चूक केलेली नाही. एका महिलेने बसण्यासाठी जागा मागितली म्हणजे ती चूक नाही. आमच्या मुलीचा छळ होत आहे. हे सर्व कोणीतरी मुद्दाम करत आहे, असं देखील दिलीप खेडकर यांनी सांगितले आहे. दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचाही आरोप होतोय. या आरोपावर खेडकर म्हणाले, माझ्याबद्दल या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. यात अजिबात तथ्य नसल्याचंहीक ते यावेळी म्हटले आहेत.
शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा; संजय राऊतांचा घणाघात
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आरोपावर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले की, कोण खोटे बोलत आहे याबद्दल मला आत्ता बोलायचं नाही. सत्य कोण सांगतंय, वस्तुस्थिती कितीही असली तरी ते वेळ आल्यावर बाहेर येईलच, आम्ही केलं असलं तरी ते बाहेर येईल.
दिल्लीतील एम्सच्या चाचणीला पूजा खेडकर सहावेळा गैरहजर राहिल्या आहेत. यावर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले, हे अर्ध सत्य आहे, यूपीएससी ही जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे. त्याच्यावर आजपर्यंत कोणी बोट ठेवलेले नाही? 20-25 लोकांचे वैद्यकीय मंडळ आहे. ही प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये होत नाही जिथे कोणी पेपर आणतो, सबमिट करतो आणि निवडला जातो. आम्ही अधिसूचनेला आव्हान दिलं होतं आणि त्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असंही दिलीप खेडकर यांनी सांगितलं आहे.