Download App

IAS पूजा खेडकरला महाराष्ट्राच्या प्रश्नांचीही उत्तरे येईनात; मॉक इंटरव्ह्युचा Video समोर

IAS Pooja Khedkar चा आणखी एक कारनामा समोर मॉक इंटरव्ह्युमध्ये महाराष्ट्राशी संबंधित 2 साध्या प्रश्नांचीही उत्तर देता आली नाही

Controversial IAS Pooja Khedkar Mock Interview video : नुकतीच वाशिममध्ये बदली झालेल्या आणि पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या वादग्रस्त (Controversial) श्रीमती पुजा खेडकर (Pooja Khedar) यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्यांच्या मॉक इंटरव्ह्युचा व्हिडीओ (Mock Interview video) समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांना चक्क महाराष्ट्राच्या प्रश्नांचीही उत्तरे देखील देता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवर आणखी एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Thangalaan Trailer: चियान विक्रम कोलार गोल्ड फील्ड्सच्या इतिहासावर आधारित, ‘तगंलान’चा ट्रेलर रिलीज

सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पुजा खेडकर यांची मुलाखत घेतली जात आहे. त्यात त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यात एक प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या गर्भपिशवी काढून टाकण्यात आल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. त्याबद्दल पुजा यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

त्याचबरोबर पुजा या महाराष्ट्रातील असल्याने त्यांना महाराष्ट्राबाबतचा आणखी एक प्रश्न यावेळी विचारण्यात आला. की, महाराष्ट्र राज्याचं जीएसटी संकलन इतर राज्यांच्या तुलनेत जास्त का आहे? त्यावर त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये उद्योगांचे प्रमाण जास्त आहे. सेवा आणि वस्तूंची निर्मिती देखील जास्त होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचं जीएसटी संकलन इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असं त्या म्हणाल्या मात्र त्यांना या प्रश्नाचं सविस्तर आणि योग्य उत्तर देता आलेलं नाही.

लोकसभेत फक्त पाडा म्हटलो पण भुजबळांना जवळ केल्यास…; जरांगेंचा फडणवीसांना इशारा

त्यामुळे आधीच वादात सापडलेल्या पुजा खेडकर यांच्या योग्यतेवर या मुलाखतीच्या व्हिडीओमुळे आणखी प्रश्न उपस्थित केले जाता आहेत. कारण एका महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि आयएएस दर्ज्याच्या अधिकाऱ्याला महाराष्ट्राशी संबंधित 2 साध्या प्रश्नांची उत्तर देता आली नाहीत.

अपंग अन् नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं?

दरम्यान लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याप्रकरणी चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अपंग आणि ओबीसी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीयं. आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांनी अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. दिल्लीतील एम्समध्ये तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर असलेल्या या आयएएस अधिकाऱ्याला आयएएस दर्जा कसा देण्यात आला असल्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे.

तर ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झालीयं. खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या या अधिकारी चांगल्याचं चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर सरकारने त्यांची वाशिमला उचलबांगडी केलीयं. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिलं या प्रकारचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्या पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. दरम्यान, त्यांनी केलेले कारनामे पाहाता आता त्यांना वाशिमचा रस्ता दाखवण्यात आलायं.

follow us