पुण्यातील सारसबाग दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाला गालबोट लागल्याची घटना घडली. (Diwali) येथे धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही गटातील तरुण मुलं एकमेकांवर धावून गेली. मात्र, सारस बागेत तैनात असलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे पुढील अनर्थ टळला.
आज बुधवारी पुण्यातील सारसबागमध्ये पाडवा पहाटच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईची उपस्थिती पाहायला मिळाली. सारसबाग मध्ये असलेल्या तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून गर्दी झाली होती. पारंपरिक वेशभूषा धारण करत तरुणाई ही त्यांच्या मित्रांसोबत या ठिकाणी पाडव्याचे निमित्त असल्याने दर वर्षी एकत्र येतात.
पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात स्टेटस्को; धर्मादाय आयुक्तांनी असा निर्णय का घेतला?
सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाटेचा कार्यक्रम यंदा आणखी एका कारणामुळे चर्चेत होता. गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत पाडवा पहाटेचा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, यंदा सारसबागेत होणाऱ्या या पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता.
हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या धमक्यांना कंटाळून आयोजकांनी पाडवा पहाटेचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुणे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासून सारसबागेच्या परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.