Download App

पुण्यात चाललंय काय?; आधी चिमुरडी अन् आता बोपदेव घाटात तरूणीवर सामूहिक अत्याचार

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचाराच केल्याची (Pune Rape Case) घटना ताजी असतानाच 21 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरात असणाऱ्या बोपदेव घाटात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. (Gang Rape On Young Girl In Pune)

समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य महाराजांना’ कायद्याचा डोस

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटामध्ये 21 वर्षे तरुणी मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्या तरुणीचे आणि मित्राचे फोटो काढले. त्यानंतर या तिघांनी तरुणीला कारमध्ये बसवत तिला येवलेवाडीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी तिघांनी तरूणीवर अत्याचार केले आणि नंतर तिला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले.

शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत केलं मोठं वक्तव्य, ‘ही’ मागणी करत पाठिंबा केला जाहीर

बोपदेव घाटात रात्रीच्यावेळी कोणीच नसते, यामुळे मदतीला कुणीच आले नाही. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून, पीडित तरुणीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लाडकी बहीण योजना अडचणीत! प्रतिज्ञापत्र सादर करा, हायकोर्टाचे राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश

अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ 

दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील वानवडी भागात असलेल्या एका स्कूल व्हॅन चालकाने दोन चिमुरडींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकर समोर आला होता. तर, दुसरीकडे पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगीक अत्याचार केल्याची घटना समोर आली. शाळेतील ‘गुड टच बॅट टच’ उपक्रमातून उघडकीस आला गंभीरप्रकार समोर आला असून नराधम बापाला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक करण्यात आली आहे. शहरातील महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण असून, पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

follow us