Pune Crime: धक्कादायक! पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती; 6 वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचार, चालकानेच…

Pune Crime: धक्कादायक! पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती; 6 वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचार, चालकानेच…

Pune Crime News: बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता त्या घटनेची पुनरावृत्ती पुणे येथे उघडकीस आली आहे. (Crime News) पुण्यात चालत्या स्कुल बसमध्ये बस चालकाने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याचा विकृत प्रकार समोर आला आहे.(Pune News) या धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Pune Police) पुण्यातील वानवडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. 45 वर्षीय व्यक्तीवर या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका नामांकित शाळेतील चिमुरडीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी हा या शाळेतील चिमुरडींना बसमधून शाळेत सोडण्याचे व आणण्याचे काम करतो. बसमध्ये दोन्ही चिमुरडी या पुढच्या सीटवर बसत असत. बस चालकाने 6 वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या 4 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालत्या बसमध्ये चिमुरडींसोबत अश्लील चाळे करत असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही चिमुरडीना जवळ बसून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यात देखील त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे.

अल्पवयीन चिमुरडी घरी परतल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी वेदना होत होत्या. त्यानंतर मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला सगळा धक्कादायक प्रकार आईला सांगितला. चिमुकलीने या सगळा प्रकार घरी सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे.

बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट

बदलापूर घटनेची पुनरावृत्ती

बदलापुरातील एका नामांकित शाळेतही अशाच प्रकारची घटना घडली होती. शाळेतच दोन चिमुरडीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. अक्षय शिंदे असं या आरोपीचे नाव होते. स्वच्छतागृहातच हा प्रकार घडला होता. या घटनेनंतरर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यांवर उतरले होते. अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आले होते. मात्र, प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला तळोजा कारागृहात नेत असता मुंब्रा बायपास येथे एन्काउंटर करण्यात आला. अक्षय शिंदे यांने पोलिसांवर गोळीबार केला तेव्हा त्याला प्रतिउत्तर देताना पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube