Download App

Dagadusheth Ganpati : विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठला केली 11 हजार शहाळ्यांची आरास

Dagadusheth Ganpati Coconut Decoration : पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Char Dham Yatra : जोशीमठजवळ कोसळली मोठी दरड, बद्रीनाथ माहमार्ग ठप्प, हजारो पर्यटक अडकले

यावेळी मंदिरात पूजा, गणेशयाग व अभिषेक झाला. गाभा-यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. पहाटे पद्मश्री डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर, आणि रागिणी शंकर यांचा व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात श्री पुष्टिपती विनायक जयंती (गणेशजन्म) निमित्त शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी 11 हजार शहाळे आणि फुलांची आरास करण्यात आली.

Tags

follow us