Download App

‘दादा आलायं’; ‘कचऱ्याची गाडी येत नाही’ म्हणणाऱ्या महिलेला दादांचं खास शैलीत उत्तर

Ajit Pawar News : देशात आज पंतप्रधान मोदींच्या(Narendra Modi) नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. महाराष्ट्रातील अनेक भागांत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या बारामती मतदारसंघात विद्यार्थ्यांसह नेते, विविध क्षेत्रातील नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला. याचवेळी एका महिलेने दादा इथं कचऱ्याची गाडीच येत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर अजित पवार(Ajit Pawar)यांनीही महिलेला मिश्किल अंदाजात प्रत्युत्तर दिलं आहे.

Ajit Pawar : ‘छगन भुजबळ अन् मी गप्पा मारत होतो’; ‘त्या’ वादावर अजितदादांचा फुलस्टॉप !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात राबवण्यात आलेल्या या अभिनयात सर्वांनी सहभाग नोंदवून श्रमदान केलं आहे. बारामती शहरात ठिकठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्याचं काम केलं. बारामतीकरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्याचं अभिनंदन करतो. आपण आपला कचरा, घाण योग्य कचरा कुंडीत टाकली, तर स्वच्छतेचा प्रश्न येणार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.

Commercial LPG Cylinder : सणासुदीत महागाईचा मोठा झटका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

याचदरम्यान अनंतनगरच्या महिलेने दादांकडे तक्रार केली. दादा इथं कचऱ्याची गाडी येत नसल्याचं महिला म्हणाली. या ठिकाणी घंटा गाडी सुरु करा घाण होणार नसल्याचंही महिलेने अजितदादांनी सांगितलं. त्यानंतर दादा मिश्किलपणे म्हणाले, या भागांत कचऱ्याची गाडी येत नाही म्हणूनच दादा आला आहे, तुमची सूचना योग्यच आहे, या शब्दांत अजित पवार यांनी महिलेला प्रत्युत्तर देत तिच्या तक्रारीची प्रशंसा केल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर अजित पवार यांनी कचऱ्याची गाडी किती वाजता येते ते पाहा आणि या भागांत रोजच्या रोज गाडी पाठवा, असे तत्काळ निर्देश प्रशासनाला दिले आहेत. महात्मा गांधींच्या 154व्या जयंतीपूर्वी देशभर स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान केले जात आहे.

श्रमदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक तारीख, एक तास, एक साथ असा नारा दिला होता. त्यानूसार आजच्या मोहिमेसाठी देशभरातील 6.4 लाख ठिकाणांची निवड करण्यात आली. या श्रमदानामध्ये भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी वेगवेगळ्या राज्यात झाडू मारून स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

Tags

follow us