Ajit Pawar : ‘छगन भुजबळ अन् मी गप्पा मारत होतो’; ‘त्या’ वादावर अजितदादांचा फुलस्टॉप !

Ajit Pawar : ‘छगन भुजबळ अन् मी गप्पा मारत होतो’; ‘त्या’ वादावर अजितदादांचा फुलस्टॉप !

Ajit Pawar : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन (OBC Reservation) सुरू असलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात खडाजंगी उडाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या वादावर काल मंत्री भुजबळ यांनी मी मोठ्या आवाजात बोलल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी आज बारामती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना याच मुद्द्यावर प्रश्न विचारला.

अजितदादा म्हणाले, त्या बैठकीत मी (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ शेजारीच बसलो होतो. आम्ही गप्पा मारत होतो. मात्र काही माध्यमांनी चुकीची बातमी दिली. आमच्यात कलगीतुरा रंगला अशी चर्चा झाली. खरं तर या मुद्द्यावर भुजबळांनी भूमिका मांडली. त्यानंतर मी ही भाष्य केले. यात काय चुकलं? असे स्पष्ट करत दोघांत वाद झाल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.

हो, अजितदादांसमोर मी माझा मुद्दा मोठ्या आवाजात मांडला : भुजबळ

लोकशाहीत प्रत्येकालाच मत मांडण्याचा अधिकार आहे. आपले म्हणणे मांडले म्हणजे आपल्यात मतभेद आहेत असे समजण्याचे काहीच कारण नाही. जे योग्य वाटते ते घ्या अयोग्य वाटते ते सोडून द्या, अशी तुम्हाला माझी विनंती आहे असे अजित पवार म्हणाले. यानंतर आता या वादावर पडदा पडेल असे सांगितले जात आहे. कारण, याआधी भुजबळ यांनी सुद्धा आमच्यात भांडण कसले अजित पवार तर माझे भाऊ असल्याचे म्हटले होते.

भुजबळ यांनीही दिली प्रतिक्रिया

बैठकीदरम्यान मी माझा मुद्दा थोड्या मोठ्या आवाजात मांडला. मात्र, याचा अर्थ आमच्यात मतभेद नाही. मी बैठकीत दिलेली आकडेवारी गायकवाड आयोगाची होती. सरकारमध्ये नोकरीत घेतांना आरक्षणाचा अनुशेष आहे. त्यामुळे न्याय मिळत नसेल तर बोलावं लागेल. नोकरीत अनुशेष दिसतोय, हे मी सांगत असतांना अजित पवारांनी सेक्रेटरींना विचारलं, त्यांनी सांगितलं अशी काही माहिती नसल्याचे सांगितले. ही माहिती नसल्याचे तसेच ती सत्य नसल्याचे म्हटल्यानंतर मी तुमच्याकडे माहिती नाही, असं होऊ शकत नाही असे उत्स्फूर्तपणे बोललो. यावेळी आमच्यात थोडीशी शाब्दीक चकामक झाली. मात्र, झालेल्या गोष्टीचा पराचा कावळा करण्यात आला. आमच्यात मतभेद नाही, मी माझा मुद्दा थोड्या मोठ्या आवाजात मांडला एवढंच. एका घरात दोन भावांच्या अशा चर्चा होत असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube