Download App

Ajit Pawar : ‘कशाला खपल्या उकरून काढता?’ आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावर अजितदादांचं मोजकचं उत्तर

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या प्रकरणी काल आव्हाड (Ram Mandir) यांनी स्वतः खेद व्यक्त केला होता. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या मुद्द्यावर अधिक भाष्य करण्यास  नकार दिला. अजित पवार आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. तसेच आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना कशाला खपल्या उकरून काढायचं काम करता, अशा मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Jitendra Awhad : ओघात बोलून गेलो! प्रभू रामांबद्दलचा वाद वाढताच आव्हाड बॅकफूटवर

शिर्डी येथील शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. श्रीराम मांसाहारी होते असे वक्तव्य त्यांनी या शिबिरात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा जवळ आलेली असतानाच आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. वाद वाढत असल्याचे पाहून काल जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भूमिका स्पष्ट केली. भाषणात ओघात बोलून गेलो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आव्हाड यांनी केला होता.

यानंतर या वादग्रस्त वक्तव्यावर प्रसारमाध्यमांनी आज पुण्यात अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली. मात्र, त्यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया देत विषय टाळला. मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. नो कमेंट्स. कशासाठी खपल्या उकरून काढायचं काम करताय असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच केला.

Ajit Pawar : ‘मी शिरुरबाबत जे सांगितलं तेच फायनल’ थेट मतदारसंघात येत अजितदादांनी ठणकावलं!

दरम्यान, देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही राजकारण करू नये. पण, देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती.

follow us