Download App

“तुझ्या तोंडात साखर पडो” : सुपर पालकमंत्रीपदावर अजितदादांचे सेफ अन् मिश्किल उत्तर

पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी, आम्ही सगळे खेळीमेळीने काम करत आहोत, राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत. चंद्रकांत पाटील यांना मुद्दाम बोलवत  नाही असं नाही. आम्ही निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता बैठका घेत आहोत, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपर पालकमंत्रीपदावर सेफ उत्तर दिले. ते पुण्यातील गणेशोत्सव नियोजन बैठकीत बोलत होते. (DCM Ajit Pawar talk on pune guardian minister post)

अजितदादा सुपर पालकमंत्री? “तुझ्या तोंडात साखर पडो”

अजित पवार यांनी मागील दोन महिन्यांपासून पुण्यात प्रशासकीय बैठकांचा धडाका सुरु केला आहे. यामुळे ते सुपर पालकमंत्री आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. याच प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, तुम्ही काहीही अंदाज लावू नका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी, आम्ही सगळे खेळीमेळीने काम करत आहोत, राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत.

भुजबळांची पवारांवर थेट टीका; अजितदादा म्हणतात भाषण ऐकूचं आलं नाही

चंद्रकांत पाटील यांना मुद्दाम बोलवत  नाही असं नाही. आम्ही निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता बैठका घेत आहोत. यात माझी बैठक घेण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही सगळे मिळून काम करत असतो. माझ्या ज्या सहकाऱ्यांना वेळ असेल, तर अलवेज वेलकम. पण माझ्या बैठकीला दिलीप वळसे पाटील वगैरे इतर मंत्री आलेच पाहिजेत असं असेल तर मी त्यांनाही बोलवीन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यात प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक होत असे. विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नियमित बैठका घेत नसल्याचे दिसून येते. याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, मी जर आयुक्तांची बैठक घेतली, तर मला असं वाटतं की मी घेतलेल्या बैठकीचा परिणाम सातच दिवस राहणार आहे. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात लगेच बैठक घेतो.

पुण्यात अजित पवारच ‘दादा’; प्रशासकीय बैठकांचा धडाका : चंद्रकांत पाटील उरले नावालाच पालकमंत्री!

काही लोकांना असं वाटतं की त्यांनी घेतलेल्या बैठकांचा परिणाम एक ते दोन महिने राहणार आहे. त्यामुळे ते एक ते दोन महिन्यांनंतर बैठका घेतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला. यावर पुन्हा एकदा तुमच्याकडे सुपर पालकमंत्री म्हणून पाहिले जात आहे, असं म्हणताच तुझ्या तोंडात साखर पडो अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

पुण्यात अजितदादांचा धडाका :

पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्री होते. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, रखडलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्न याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर बैठकांचा धडका सुरु केला असून ते चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us