पवारांविरोधात भुजबळांचे जीव तोडून भाषण; अजितदादा म्हणतात भाषण ऐकूचं आलं नाही

  • Written By: Published:
पवारांविरोधात भुजबळांचे जीव तोडून भाषण;  अजितदादा म्हणतात भाषण ऐकूचं आलं नाही

पुणे : अजित पवार गटाची कालची (दि.27) बीडमधील सभा चर्चेत आली ती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या भाषणामुळे. भाषणावेळी भुजबळांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांच्या या टीकेवर पवाराचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit PAwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांनी शरद पवारांवर केलेली टीका अजित पवारांना पटली का? असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर आपल्याला भुजबळांचं भाषण ऐकूच आलं नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. अजितदादांच्या या उत्तरामुळे एकप्रकारे त्यांनी स्वतःला सेफ केल्याचे बोलले जात आहे.

पटेलांचा दावा बावनकुळेंचा नियमांसह दाखला; अजितदादा महिनाभरात होणार NCP चे अध्यक्ष?

काय म्हणाले अजित पवार

बीडमधील सभेत छगन भुजबळ यांचे भाषण सुरू झाले. यात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरूवात केली. त्यामुळे उपस्थित कार्यकर्तांकडून गोंधळ घालण्यास सुरूवात करण्यात आली. यामुळे भुजबळांना त्यांचे भाषण ओटोपते घ्यावे लागले. पवारांवरील टीकेनंतर एकीकडे भुजबळ टीकेचे धनी होत असून, यावर माईक सिस्टिममुळे भुजबळांचे भाषण ऐकूच आले नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

उध्दव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता एन.डी. स्टुडिओ, त्यासाठी देसाईंना धमक्या; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

कुणाच्या भावना दुखावल्या जातील याची काळजी घ्यावी

“मी जिथं बसलो होतो, तिथं माईक सिस्टिम अशी होती की समोरच्या पब्लिकला ते ऐकायला जात होतं. पण मला ते भाषण नीट ऐकायला आलं नाही. मात्र, बीडवरुन औरंगाबाद आणि तिथून पुण्याला येताना काही बातम्या वाचनात आल्या. व्यस्त कार्यक्रमांमुळे याबाबत माझं आणि भुजबळांचे बोलणे झालेले नाही असे म्हणत राजकीय जीवनात आपली भूमिका मांडत असताना कोणाच्या भावना दुखवल्या जाऊ नये याचा प्रयत्न केला पाहिजे असे अजितदादा म्हणाले.

“तुझ्या तोंडात साखर पडो” : सुपर पालकमंत्रीपदावर अजितदादांचे सेफ अन् मिश्किल उत्तर

काय म्हणाले होते भुजबळ?
काल (दि. 27) बीडमध्ये पार पडलेल्या अजित पवार गटाच्या सभेत बोलताना भुजबळांनी पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भुजबळांनी पवारांनी आपल्याला राजीनामा अचानक द्यायला कसे सांगितले असे एक न एक मुद्दे बाहेर काढत टीका केली. मात्र, यानंतरही आपण पक्ष सोडला नाही. मात्र, भुजबळांच्या या टीकेवेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे वाढता गोंधळामुळे भुजबळांना त्यांचे भाषण वेळेपूर्वीच आटोपते घ्यावे लागले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube