पटेलांचा दावा बावनकुळेंचा नियमांसह दाखला; अजितदादा महिनाभरात होणार NCP चे अध्यक्ष?
मुंबई : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचला आहे. अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळतील असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांनी काल (दि.27) बीडच्या सभेत केला. त्यानंतर आता या दाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule) यांनी नियमांचा दाखला दिला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात राष्ट्रवादीचे अध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात पडण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
उध्दव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता एन.डी. स्टुडिओ, त्यासाठी देसाईंना धमक्या; नितेश राणेंचा गौप्यस्फोट
काय म्हणाले होते पटेल?
बीड येथील सभेत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळणार असल्याचा दावा पटेल यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गटातील नेत्यांची धडधड वाढली असून, असं झाल्यास येत्या महिनाभरात राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडण्याची चर्चा सुरू झाली आहे.
बावनकुळेंनी दाखला देत सांगितला नियम
एकीकडे पटेल यांच्या दाव्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही पुरावे असतील. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असेल. मात्र, योग्य तो निर्णय निवडणूक आयोग घेईल.
पुण्यात अजित पवारच ‘दादा’; प्रशासकीय बैठकांचा धडाका : चंद्रकांत पाटील उरले नावालाच पालकमंत्री!
पक्ष अन् चिन्ह मिळण्याचा नियम काय?
पुढे बोलताना बावनकुळेंनी नियमांचा दाखला दिला. ते म्हणाले की, ज्या पक्षाचे खासदार, आमदार जास्त, पक्ष त्याचाच असा नियम आहे.आमदार, खासदार जास्त पक्ष त्याचाच असतो. अजित पवार गटाकडे आमदार जास्त असतील त्यामुळे पटलेंनी असा दावा केला असेल. निवडणूक आयोग हा निष्पक्ष असतो. त्यामुळे प्रफुल्ल पटेल म्हणाले, त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल.