Download App

पुणेकरांसाठी फडणवीसांचे मोठे गिफ्ट; कोटींची गुंतवणूक अन् हजारो नोकऱ्या

Devendra Fadanvis On Pune Investment :  राज्याच्या दृष्टीने व पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बजाज फिनसर्व ही कंपनी पुण्यामध्ये मोठा उद्योग उभा करणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सरकार आणि या कंपनीमध्ये त्यासंदर्भात करार झाला असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे.

आज महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिन्सर यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि या एमओयूच्या माध्यमातून ही कंपनी पुण्यामध्ये 5 हजार कोटींची गुंतवणूक करते आहे. या उद्योगामुळे 40 हजार जॉब तयार होणार आहे. मला असं वाटतं की नजीकच्या काळातील फिनटेकमधील ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे, असे फडणवीस म्हणाले.

‘त्यांच्या बोलण्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत’; अजितदादांचा राऊतांवर पलटवार

तसेच हळुहळु पुणे हे आता फायनान्शिअल कंपनीचे हब बनते आहे व फिनटेकचे देखील हब बनत असल्याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले. आजच्या करारामुळे या हबला मोठा बूस्ट देखील मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, याआधी वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प पुण्यात येणार होता. त्यानंतर तो गुजरातला गेला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. त्यामुळे आता या प्रकल्पाने सरकारने नवीन उद्योग राज्यात आणला आहे.

गोपीनाथ मुंडेंची एक भेट अन् काँग्रेसने उमेदवाराचे तिकीटच कापले; तावडेंनी सांगितला खास किस्सा

यावेळी फडणवीसांनी ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृत्यूंना श्रद्धांजली वाहिली. हा अपघात अतिशय दुखद आहे. हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबियांना देवो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

Tags

follow us