Deenanath Mangeshkar Hospital : राज्यात सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि गर्भवती महिला मृत्यू प्रकरण चांगलंच गाजत आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मंगेशकर रुग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) प्रशासनामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरु लागलेली असतानाच मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केलायं. डिपॉझिटचा उल्लेख आम्ही करीत नाहीत मात्र, आमचे ग्रह फिरले म्हणून त्या दिवशी डिपॉझिटचा उल्लेख झाला असल्याचं केळकरांनी स्पष्ट केलंय.
पुढे बोलताना केळकर म्हणाले, भिसे कुटुंबियांनी याआधी रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत. आम्ही कोणत्याही केसमध्ये पैशांअभावी उपचार थांबवत नाही. रुग्णाच्या प्रवेश अर्जावर कोणत्याही प्रकारचा आम्ही पैशांबाबत उल्लेख करीत नाही. घटनेच्या दिवशी आमचे ग्रह फिरले म्हणूनच रुग्णाच्या अर्जावर पैशांचा उल्लेख करण्यात आला होता, मात्र, भिसे कुटुंबिय ट्रस्टींना भेटले असते तर आज कदाचित वेगळी परिस्थिती असते, असं केळकरांनी स्पष्ट केलंय.
Prakash Ambedkar : UPSC परिक्षेतून आरक्षण हटवलं! आंबेडकरांनी तेलंगणा सरकारला फैलावर घेतलं…
तसेच अद्याप शासनाचा एकच अहवाल समोर आला असून या मृत्यूप्रकरणी काल महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक प्रश्नांची आम्ही उत्तरे दिली आहेत. शासनाचे तिन्ही अहवाल आल्यानंतर आम्ही संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. आम्ही रुग्णांकडून डिपॉझिट भरुन घेणे बंद केलंय. कामाच्या ताणामुळे रुग्णालयाता स्टाफ कधीकधी नीट बोलत नाही, रुग्णाशी नीट बोललं पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचं केळकर म्हणाले आहेत.