Download App

महापालिकेचा एकही रुपया थकवलेला नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डीनचं स्पष्टीकरण

दीननाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा एकही रुपया कर थकवलेला नाही, असं स्पष्टीकरण कार्यकारी संचालक धनंजय केळकर यांनी दिलंय.

Deenanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर (Deenanath Mangeshkar Hospital) गंभीर आरोप केले जात आहेत. मृत गर्भवती महिला तनिषा भिसे कुटुंबियांसह विविध संघटनांकडून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीयं. तर रुग्णालयाने महापालिकेचा कर थकवल्याचाही आरोप करण्यात येतोयं. या पार्श्वभूमीवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय. महापालिकेचा एकही रुपया रुग्णालयाने थकवलेला नसल्याचं केळकरांनी सांगितलंय. पुण्यात आज केळकर पत्रकार परिषदेत बोलत होते.

कौटुंबिक मनोरंजनाचा धमाल तडका! प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला-सुजीत’ ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

पुढे बोलताना केळकर म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चारिटी ट्रस्ट असून आम्हाला व्यवसायिक दराने कर लावू नये, त्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आम्ही आत्तापर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून महापालिकेचा कर भरत आहोत. आम्ही आत्तापर्यंत महापालिकेचा एकही रुपया थकवलेला नाही, असं धनंजय केळकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प, भाजपा स्थापना दिनी CM फडणवीसांची ग्वाही

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेचा 2019 पासुनचा प्रॅापर्टी टॅक्स थकवला असून हा कर थोडाथोडका नसून तब्बल 27 कोटी 38 लाख रुपयांचा कर थकवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा वर्षात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कराचा एकही रुपया भरला नाही. रुग्णालय चालविण्याची जबाबदारी असणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने सन 2019 पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने सादर केलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थाप-नाने गेल्या सहा वर्षांपासून पुणे महानगरपालिकेचा 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांच कर थकवला आहे.

follow us