Download App

पुणे अजित पवारांचचं, सभेत दादांबद्दल वाकडं बोलाल तर…; दीपक मानकरांचा इशारा

  • Written By: Last Updated:

पुणे :अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचा मोठा गट अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाला. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. शरद पवार 17 ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुणे जिल्यातही ते सभा घेणार आहेत. दरम्यान, अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी शरद पवार गटाला इशारा दिला. पुण्यातल्या पवारांच्या सभेत अजितदादांबद्दल काही वाकडं बोलाल तर जशास तसं उत्तर देऊ, असं मानकर म्हणाले. (Deepak mankar on sharad pawar group they warn if you speak crookedly about Ajit meeting)

शरद पवार यांनी येवल्यात सभा घेतली. त्यानंतर आता ते राज्यभर सभा घेणार आहेत. दरम्यान, शरद पवारांनी सभा घेतल्या तर आम्हालाही उत्तर सभा घ्यावी लागेल, असं इशारा अजित पवारांनी दिला होता. याविषयी आज लेट्सअपशी बोलतांना मानकर यांनी सांगिलतं की, अजित पवारांविषयी शरद पवार काही बोलतील की नाही, ठाऊक नाही. मात्र, त्यांच्या सोबत असलेले काही लोक अजित पवारांवर टीका करतील. पण, अजित दादांविषयी सभेत काही चुकीचे विचार मांडले गेले तर अजित दादा नक्की उत्तर देतील. आणि आम्हीही काही शांत बसणारे कार्यकर्ते नाही. आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा मानकर यांनी दिला.

Radhakrushn vikhe : महापुरुषांवर बेताल वक्तव्य, विखे म्हणाले, प्रसिद्धीसाठी काहीजण… 

ते म्हणाले, शरद पवारांना आम्ही आजही दैवत मानतो. परंतु, ते दौरे करणारच आहेत. काल-परवाचं त्यांनी सांगितलं की, आम्ही एक आहोत. आणि आता दौरे करताहेत. त्यांचं नेमकं काय चाललं हेच कळत नाही. पुणे शहरात जसं शरद पवारांचं अस्तित्व आहे, तसचं अजित पवारांचं देखील अस्तित्व आहे. शरद पवारांनी अजित पवारांनी आशिर्वाद दिले तर महाराष्ट्र सुललाम-सुफलाम होईल. त्यामुळं त्यांनी अजित दादांना आशिर्वाद द्यावे, अशी आमच्यासह तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

अजित पवारांच्या बंडाला पवाराची फुस आहे का? असं विचारल्यावर मानकर म्हणाले, अजित पवारांच्या बंडाला पवारांची फुस आहे, असं मी म्हणणार नाही. राजकीय जीवनता परिवर्तन हा नियतीचा नियम असतो. सत्तेतर राहून समाजाचं दुख कसं कमी करता येईल, ही अजित दादांची भावना आहे. चांगलं काम ह्या राज्यात कसं होईल? समाजाचं हित कसं जपल्या जाईल, अशी अजित पवारांची भावना आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे दादा आहेत, असंही मानकर म्हणाले.

पुढं ते म्हणाले, पुणे अजित पवारांचंच राहणार आहे. पुणे शहराचा सर्व केला तर असं लक्षात येतं की, कार्यकर्ते हे अजित पवारांसोबत आहेत. अजित पवारांची ताकत पुण्यात मोठी आहे. कार्यकर्त्यांचा अजित दादांवर विश्वास आहे. त्यामुळं कार्यकर्ते त्यांची पाठराखन करत आहे. पुण्यातील ८० ते ८५ टक्के नगरसेवक आमच्या गटाकडे आहेत. पुणे जिल्ह्यात आमचं संख्याबळ अधिक आहे, असं मानकर यांनी सांगितलं.

Tags

follow us