Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (Somnath Zende) यांनी ड्रीम इलेव्हनवर (Dream 11) टीम लावून कोट्यावधींचे मालक झाले. त्यांची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता झेंडे अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. चौकशीनंतरच या प्रकरणात निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
अजितदादांचा राजीनामा! जिल्हा बँकेच्या माध्यमातून पार्थ पवारांची राजकारणात होणार ग्रँड एन्ट्री?
पोलीस उपनिरीक्षक झेंडे क्रिकेट चाहते आहेत. विश्वचषक स्पर्धेत त्यांनी क्रिकेट संघातील खेळाडूंचा अभ्यास केला. त्यानंतर ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन अॅपवर टीम लावली. बांग्लादेश विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात झेंडे यांची टीम अव्वल आली. त्यांना थोडथोडके नाही तर दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले. यानंतर त्यांच्या खात्यात पैसे येण्यासही सुरुवात झाली.
मात्र, आता हाच प्रकार त्यांना त्रासदायक ठरणार आहे. झेंडे कुटुंबाचा आनंद फार काळ टिकला नाही. बक्षिसाच्या दीड कोटींमुळे झेंडे यांना आता खात्यांतर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तरुण पिढी भरकटत चालली आहे. पैसे मिळवून देणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याची मागणीही केली जात असते. कारण, या गेमिंगमधून अनेकांची फसवणूक झाल्याचीही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यानेच गेमिंगच्या माध्यमातूनच दीड कोटी कमावल्याने या प्रकाराची मोठी चर्चा झाली.
विश्वास नव्हता पण नशीबच चमकलं; PSI ऑनलाईन गेम खेळला अन् दीड कोटी जिंकला
या प्रकरणात आता सोमनाथ झेंडे यांची डिसीपींकडून चौकशी करण्यात येणार आहे. प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी यामध्ये तपासण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली. या चौकशीत आता कोणत्या बाबी तपासल्या जातात, त्यानंतर झेंडे यांच्यावर खरंच कारवाई होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना सोमनाथ झेंडे काल म्हणाले होते, की मला क्रिकेट खेळायला आवडते. त्यामुळे मॅच बघत असताना टीव्हीवर या गेमबद्दल समजलं. त्यानंतर मी २-3 महिन्यांपासून हा गेम खेळत आहे. मागील काही दिवसांत मी सहा ते सात मॅच खेळलो. त्यानंतर हे बक्षीस मला मिळालं आहे, पण सुरुवातील हे मला खरं वाटत नव्हत त्यानंतर चेक करुन पाहिल्यानंतर मला विश्वास बसला की आपल्या खात्यात खरंच पैसे आले आहेत. हा गेम जोखीमेचा आहे, अर्थिक जबाबदारी सांभाळून खेळला पाहिजे, किती खेळायंच किती नाही ते आपल्यावर असल्याचं सोमनाथ झेंडे म्हणाले होते.