Devendra Fadanvis Call to Leshpal Jawalage : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder case)घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ (Sadashiv Peth)या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरुणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. मात्र लेशपाल जवळगे (Leshpal Jawalge)या तरुणासह तिघांनी या मुलीला वाचवलं. त्यानंतर या मुलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या तरूणांना फोन करत त्यांचं कौतुक केलं आहे. (Devendra Fadanvis Appreciate leshpal javalage and harshad patil for save girl in pune attack )
पुण्यात सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यात तरुणीला वाचविणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवर कौतुक केले.
–#punegirlattack #devendrafadnavis #punecrime #leshpaljavlage #harshadpatil #maharashtra #letsuppmarathi pic.twitter.com/6cih82jCEY— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 29, 2023
ODI World Cup 2023: वर्ल्ड कपमुळे बॉलीवूडला बसणार जबर फटका ! पाहा कोणते आहे ते सिनेमा?
या तरूणांना फोन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच त्यांना यावेळी फडणवीसांनी शुभेच्छा देखील दिल्या. तर यावेळी फडणवीसांना लेशपाल जवळगे याने फडणवीसांचे आभार मानले आणि तुम्ही आम्हाला फोन केला. तुम्ही आमच्याशी बोलत आहात फार छान वाटत आहे. अशा भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या.
काय आहे प्रकरण?
भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. मात्र सुदैवाने ती वाचली.
Adipurushवर हायकोर्टाचे ताशेरे; ‘धर्माचे चुकीचे वर्णन करू नये’, म्हणत सेन्सॉर बोर्डाला झापलं
भर रस्त्यावरच हा भयावय प्रकार सुरू असताना या तरूणीच्या मदतीला सुरूवातीला कोणीही आलं नाही. मात्र लेशपाल जवळगे या तरूणांनी धाडस करून हल्ला करणाऱ्या तरूणाला रोखल आणि सुदैवाने तिचे प्राण बचावले. या तरूणीला बचावणाऱ्या तरूणाने या हल्लेखोराला चांगला चोपही दिला. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. तर सुदैवाने दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती होता-होता राहिली आहे.