ODI World Cup 2023: वर्ल्डकपमुळे बॉलीवूडला बसणार जबर फटका ! पाहा कोणते आहे ते सिनेमा?

ODI World Cup 2023: वर्ल्डकपमुळे बॉलीवूडला बसणार जबर फटका ! पाहा कोणते आहे ते सिनेमा?

ODI World Cup 2023: देशात या वर्षांमध्ये वनडे वर्ल्ड कप (World Cup) होणार आहे. वर्ल्ड कपच शेड्युल देखील जाहीर करण्यात आले आहे. परंतु क्रिकेट चाहते अनेक दिवसापासून वनडे वर्ल्ड कपच्या शेड्युलची आतुरतेने वाट बघत आहेत. शेड्युल जाहीर झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक मोठ्या सिनेमासाठी (Cinema) अडचणी वाढताना दिसून येणार आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

कारण ज्यावेळी वर्ल्ड कपचे सामने आहेत, त्याचवेळेस अनेक मोठ्या स्टार्सचे सिनेमे रिलीज करण्यात येणार आहेत. यामुळे वर्ल्ड कपचा या सिनेमाच्या बिझनेसला मोठा फटका बसणार आहे. वर्ल्ड कप यावर्षी ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. ५० ओव्हर्सचा वर्ल्ड कप १२ वर्षाच्या कालावधीनंतर देशात होत आहेत. वर्ल्ड कपच्या दरम्यान रिलीज होणाऱ्या सिनेमाच्या बिझनेसवर वर्ल्ड कप मॅचचा चांगलाच प्रभाव पडू शकणार आहे. कारण चाहते सिनेमे नाहीतर त्यावेळी क्रिकेट सामने बघताना दिसून येणार आहेत.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड कपची पहिली मॅच ५ ऑक्टोबरला होणार आहे. यादिवशी खिलाडीचा ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर २० ऑक्टोबरला टायगर श्रॉफचा गणपत आणि यारिया २ हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यावेळी बंगळुरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगताना दिसून येणार आहे. तसेच वीकेंडला भारताचा सामना आहे. त्यानंतर प्रत्येक वीकेंडला भारताचा एक सामना राहणार आहे.

रविवारी ८ऑक्टोबर दिवशी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि रविवारी १५ ऑक्टोबर दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगताना दिसून येणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. रात्री १०-११ पर्यंत मॅच संपणार आहे. त्यावेळेस या सिनेमावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. द ग्रेट इंडियन रेस्क्यू, गणपत आणि यारियां २ नंतर २४ ऑक्टोबर दिवशी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा वॅक्सीन वॉर, सिद्धार्थ मल्होत्रा यांचा योद्धा तर १० नोव्हेंबरला भाईजानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

वर्ल्ड कप १९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. टायगर श्रॉफ असो, किंवा भाईजान वर्ल्ड कपची क्रेज सुरु झाल्यावर चाहत्यांना थिएटरकडे खेचून आणणं सोपं नसणार आहे. बॉलिवूड अगोदरपासूनच कंटेटच्या समस्येचा सामना करत आहे. चाहते थेट सिनेमाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येणार आहे. त्यामध्ये आता बॉक्स ऑफिसला क्रिकेट वर्ल्ड कपपासून मोठा धोका होणार असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube