‘माझ्या नावाचं बेकायदा होर्डिंग लागलं तर पुरस्कारांच्या यादीत माझंही नाव टाका’; पुण्यातील होर्डिंग कारवाईवर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

Devendra Fadnavis: पुणे महापालिका प्रशासनाचं कौतूक करत फडणवीसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना बेकायदा होर्डिंगऐवजी जनतेत दिसण्याचा सल्ला दिला.

Devendra Fadnavis on Illegal Hoardings Pune

Devendra Fadnavis on Illegal Hoardings Pune

Devendra Fadnavis on Illegal Hoardings Pune: पुणे शहरात सध्या अतिक्रमण आणि विशेषतः बेकायदा होर्डिंगविरोधात महापालिकेकडून जोरदार कारवाई सुरू आहे. या कारवाईचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. पुणे महापालिका प्रशासनाचं अभिनंदन करतानाच त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना बेकायदा होर्डिंग लावण्याऐवजी जनतेत दिसण्याचा सल्लाही दिला आहे. ‘उद्या माझ्या नावाचं बेकायदा होर्डिंग लागलं, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझंही नाव जाहीर करा,’ अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी केली आहे.

नव वर्षात मोठं संकटं घोंगावतंय?; घरात पुरेसं अन्न अन् रोकड ठेवा; ओपन लेटरनं खळबळं

फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचं समर्थन केलं. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी पुरेशी जागा असली पाहिजे. नियम हे केवळ सरकारी दस्तावेजांमध्ये छापण्यासाठी नसतात, तर त्यांचं पालनही झालं पाहिजे. सर्वसामान्यांचं जीवन सुखकर व्हावं, हाच नियमांचा उद्देश असतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘बेकायदा होर्डिंगवर नाही, नेते जनतेत दिसले पाहिजेत’

बेकायदा होर्डिंगची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून देशभरातील अनेक शहरांमध्ये ती दिसते. त्यामुळे अशा होर्डिंगवर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई होणं आवश्यक आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पुणे प्रशासनाने यासाठी स्वीकारलेली अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीची संकल्पना विशेष कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड! डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

याच मुद्द्यावर त्यांनी स्वतःचं उदाहरण देत प्रशासनाला मिश्किल आवाहन केलं. ‘उद्या माझ्या नावाचं बेकायदा होर्डिंग लागलं, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझंही नाव जाहीर करा,’ असं ते म्हणाले.

नागपुरातही बेकायदा होर्डिंगविरोधात कारवाई करा!

येत्या काळात नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदा होर्डिंग लावण्याचे प्रकार सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी आणि शहराचं विद्रुपीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे.

 

दरम्यान, नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी कायम जनतेमध्ये दिसलं पाहिजे, बेकायदा होर्डिंगवर नाही, असा संदेश देत फडणवीस यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला. पुण्यातील होर्डिंगविरोधी कारवाईच्या निमित्ताने त्यांनी इतर शहरांमधील प्रशासनालाही अशा प्रकारच्या मोहिमेसाठी प्रोत्साहन दिलं आहे.

Exit mobile version