Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटने केली. त्याचबरोबर राजकीय फटकेबाजी केली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून फडणवीस यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहेत. तसे शरद पवारांनी आपल्या पुस्तकात लिहिलेले आहे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुणेकर होणार? लोकसभा पोटनिवडणुकीआधी सूचक विधान
फडणवीस म्हणाले, वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहे. कोणी कसे बसायचे ? कोणी कुठे उभे राहायचे ? कोणी बोलायचे ? या विषयावरून वाद सुरू आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांबाबत शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे. आम्ही विरोधक आहोत. त्याबद्दल बोलण्याची गरज नाही.
‘फडणवीस यांच्यामुळे बीपी वाढतो किंवा कमी तरी होतो…’
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ते म्हणाले, मी काहीच बोलू शकत नाही. हे संपूर्ण प्रकरण अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा आहे. तो निर्णय विधानसभा अध्यक्षा देतील.
महेश लांडगेंनी फडणवीसांना पिठलं खाऊ घातलं.. त्यावरच मंत्रीपदाच्या चर्चेला तोंड फुटलं!
एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि 25 वर्ष विधानसभेत काम केले आहे.मला असे वाटते की आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे पुरते संपले आहे. महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावे लागते आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.