महेश लांडगेंनी फडणवीसांना पिठलं खाऊ घातलं.. त्यावरच मंत्रीपदाच्या चर्चेला तोंड फुटलं!

महेश लांडगेंनी फडणवीसांना पिठलं खाऊ घातलं.. त्यावरच मंत्रीपदाच्या चर्चेला तोंड फुटलं!

विष्णू सानप – लेट्सअप विशेष

Devendra Fadnavis meets MLA Mahesh Landge : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज पुणे, पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज शहरातील विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. या धावपळीमध्ये भोसरीचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या घरी फडणवीसांच्या पाहुणचाराचा खास बेत आखण्यात आला होता. जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, पिठलं, ठेचा आणि शिरा ठेवण्यात आला होता. लांडगे यांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला पुढील नियोजित दौरा केला.

मंत्रिमंडळ विस्तार आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा पुणे, पिंपरी- चिंचवड दौरा महत्वपूर्ण बोलला जात आहे. निमित्त जरी उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या असले तरी फडणवीस हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष निवडीची तसेच, मंत्रिमंडळ विस्ताराची चाचपणी तर करत नाहीत ना?, आशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देणारे सुप्रीम कोर्टाचे ‘ते’ न्यायाधीश निवृत्त

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडला स्थान मिळेल याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड मधून आमदार लांडगे तर पुणे ग्रामीण मधून आमदार राहुल कुल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यात महापालिका निवडणुका देखील जवळ आल्याने शहराध्यक्ष बदलाचे वारे देखील वाहू लागले आहेत. यामुळे ताकतीचा आणि सर्व शहर पदाधिकाऱ्यांच्या सहमतीचा शहराध्यक्ष देणं भाजप समोर एक आव्हान आहे. यामुळे देखील फडणवीसांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, लंडनहून परतताच राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद मिळावे ही मागणी तशी जुनीच आहे. मात्र, आता तिचा विचार केला जाऊ शकतो आणि महेश लांडगे यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे सर्वांना मान्य असेल असा आणि तगडा शहराध्यक्ष शोधणं भाजपसाठी आव्हानात्मक झाल आहे. त्यामुळे महेश लांडगे यांनाच महापालिका निवडणूक होईपर्यंत अध्यक्षपदी ठेवण्यात येईल, असेही अनेकांकडून बोलले जात आहे.

दरम्यान, फडणवीस आणि महेश लांडगे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. मात्र, सध्याचा राजकारण पाहता कधी काय सूत्र हलतील याचा काही नेम नाही. त्यातही भाजपची रणनीती ही धक्का तंत्राची, त्यामुळे मंत्रिपद आणि शहराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? याचा काही नेम नाही. तूर्तास लांडगेंच्या घरी फडणवीसांनी घेतलेला पाहुणचाराचा राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube