Bageshwar Baba Controversial Statement In Pune : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून वादाला तोंड फुटलेले असतानाचा आता बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shashtri) यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल, असे विधान केले आहे.
Video : विविधतेत एकता! रोहित, विराटला धीर तर, जडेजाशी मोदींचा गुजरातीत संवाद
आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला आहे. मीही संविधानाचा स्वीकार करतो. पण त्याच संविधानात आतापर्यंत 125 वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यामुळे आणखी एकदा हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय बिघडलं असे विधान शास्त्री यांनी केले आहे. बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग आणि दरबार कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शास्त्री यांनी वरील विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sanjay Raut : ‘दिडदमडीचे लोक आमच्यावर टोळधाड सोडतात, भाजपा म्हणजे’… राऊतांचा हल्लाबोल
मुस्लिमांसह इतर धर्मियांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही
एकीकडे शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी घटना दुरूस्ती करण्याचे सुचवले आहे. यामुळे भविष्यात जर, हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिम आणि अन्य धर्मातील नागरिकांनी कुठे जायचं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. त्यामुळे जरी हिंदूराष्ट्र स्थापन झाल्यास देशातील मुस्लीम किंवा अन्य धर्मियांना कुठेही पळून जाण्याची गरज नसल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले.
…तर तुमची तिरडी बांधली जाईल
यावेळी बागेश्वरबाबा यांनी काही वर्षांपूर्वी पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, हिंदूराष्ट्र स्थापन झाल्यानंतर अन्य धर्मियांना कुठेही पळून जाण्याची गजर नाही हेच आम्हाला जनतेला समजावून सांगायचे आहे. कारण रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता असे शास्त्री म्हणाले. हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही.
‘राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट..,’; बावनकुळेंच्या कथित व्हायरल फोटोवर फडणवीस बोलले
हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये साधूंबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल असा कडक इशाराही शास्त्री यांनी दिला.