Bageshwar Baba : ज्यांना माझी अडचण त्यांनी हाजमाची गोळी खावी; बागेश्वर बाबांनी ‘अंनिस’ला डिवचलं

Bageshwar Baba : ज्यांना माझी अडचण त्यांनी हाजमाची गोळी खावी; बागेश्वर बाबांनी ‘अंनिस’ला डिवचलं

Bageshwar Baba : महाराष्ट्र (Maharashtra)ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम महाराजांबद्दल (Saint Tukaram Maharaj)माझ्या मनात अपार निष्ठा आहे. सर्व संत माझ्यासाठी देवासमान आहेत. त्यामुळे वेळ मिळाल्यानंतर आपण संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचेही यावेळी बागेश्वरधामचे धीरेंद्रशास्त्री यांनी सांगितले. ते पुण्यात तीन दिवस भागवत् कथा सांगणार आहेत. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध करत कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली, त्यावर बागेश्वरबाबा म्हणाले की, ज्यांना आमची अडचण होते, त्यांनी हाजमाची गोळी खावी, असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.

‘हॉटेलमध्ये रेस्टॉरंट अन् कसिनो एकाच..,’; व्हायरल फोटोवर बावनकुळेंची सारवासारव

या तीन दिवसांमध्ये लोकांना भगवत भक्ती, भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यावेळी मला एका पुस्तकाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांबद्दलची माहिती मिळाली होती. आपापली भाषा बोलण्याचा एक पद्धत असते. आम्ही त्याला बुंदेलखंडी टोनमध्ये सांगितलं. त्यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यावर आम्ही माफी देखील मागितली.

धनगर आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; नऊ सदस्यांची समिती गठित

बागेश्वर बाबा म्हणाले की, संत तुकाराम महाराज आम्हाला सनातन धर्मासाठी महात्मा आहेत. ते साक्षात देवाप्रमाणे आहेत. त्यामुळे मला जसा वेळ मिळेल तेव्हा संत तुकाराम महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी देखील जाणार आहे.

पत्रकारांनी शिर्डी साईबाबांबद्दल काही टीपणी केली होती, अशी विचारणा केली, त्यावर बागेश्वर बाबा म्हणाले की, मी त्यांच्यावर काही टीपणी केली नाही, मी असं सांगितलं होतं की, प्रत्येकजण शब्दाचा अर्थ आपापल्या पद्धतीनं लावत असतो.

मला कोणीतरी विचारलं होतं की, साईबाबा देव आहेत का? त्यावर बागेश्वर बाबा म्हणाले की, आपल्या कोणत्याही धर्मग्रंथामध्ये त्यांचा अवतार नाही. पण संत देवासमान असतात. ज्याची जशी आस्था असते. आपापल्या गुरुला देवासमान मानलं जाऊ शकतं, त्यापासून कोणाला अडवलं जाऊ शकत नाही, कारण मी काही न्यायालय नाही किंवा देव नाही.

कोणीतरी विचारलं की साईबाबा देव आहेत का? तर आम्ही सांगितलं की, शास्त्रामध्ये तर असं काही दिलेलं नाही. तुम्ही त्यांना देव मानत असाल तर ती तुमची वैयक्तिक श्रद्धा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube