धनगर आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; नऊ सदस्यांची समिती गठित

धनगर आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; नऊ सदस्यांची समिती गठित

Dhangar reservation : राज्यात मराठा-ओबीसी (OBC reservation) आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. जरांगेंच्या विरोधात छगन भुजबळांनी भूमिका घेतल्याने राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे. तर धनगर समाजाचा (Dhangar reservation) अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा यासाठी देखील चौंडी येथे उपोषण सुरु आहे. या मागणीची दखल घेत नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

राज्य सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे. तीन महिन्यांच्या आत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.

बावनकुळे मकाऊमध्ये तीन पत्ती खेळत असल्याचा फोटो काँग्रेसकडून शेअर

मध्यप्रदेश, बिहार, तेलंगणा या राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये जाती निहाय यादीमध्ये असलेल्या समाजाला लाभ उपलब्ध करुन देण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास समिती करणार आहे. या तिन्ही राज्यातील विशिष्ठ जातींना जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अवलंबलेल्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहे. या राज्यातील कागदपत्र आणि न्यायालयीन प्रकरणाचे दस्तावेज उपलब्ध करुन अभ्यास केला जाणार आहे. तीन महिल्यांच्या आत समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे.

इतिहासाचा दाखला, मंत्र्यांवर निशाणा; पुण्याच्या खराडीत जरांगेंनी पुन्हा फुंकलं रणशिंग

या समितीमध्ये दे. आ.गावडे, संतोष वि.गावडे, धनंजय सावळकर, जगन्नाथ महादेव वीरकर, जे.पी.बघेळ, एम.ए.पाचपोळ, माणिकराव बापुराव दांडगे पाटील आणि जी.बी. नरवटे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube