Download App

पुण्यातील ‘त्या’ जागेशी अजित पवारांचा संबंध नाही, माजी विभागीय आयुक्तांचा खुलासा

  • Written By: Last Updated:

Dilip Band : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह अजित पवारांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे आगामी काळात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर आता माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड (Dilip Band) यांनी खुलासा केला. पुण्यातील जागेशी अजित पवारांचा संबंध नसल्याचं ते म्हणाले.

कंत्राटी भरतीमुळे कायदा-सुव्यवस्था कशी राहील ? शरद पवारांचा सरकारला सवाल 

तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी या आरोपांविषयी बोलतांना सांगितले की, अजित पवार यांचा या भूखंड प्रकरणी काही संबंध नाही. हा संपूर्ण प्रस्ताव गृहमंत्र्यांकडून आला होता. तेव्हा अजित पवार पालकमंत्री होते. ते म्हणाले, येरवड्यातील त्या जागेजवळ एका डेव्हलपरची देखील जागा होती. त्यांनी प्रस्ताव दिला की, तुमचं पोलिस स्टेशन आम्ही बांधून देतो, तुमची जागा आम्हाला द्या. तेव्हा विभागीय आयुक्त म्हणून मी, तेव्हाचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह तसेच तत्कालीन चीफ सेक्रेटरी अयंगार मॅडम अशा आम्हा तिघांना तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बैठकीला बोलावलं आणि त्या प्रस्तावाबाबद सांगितलं.

बंड पुढे म्हणाले, त्यावेळी मी मंत्र्यांना सांगितलं की, बदल्यात आपल्याला फायदा होणार आहे. जर पोलीस क्वार्टर बांधून दिल्या तर आपल्याला फायदा होईल. कारण, त्यावेळी शिवाजीनगर येथील पोलीस वसाहत मोडकळीस आली होती. तेव्हा मंत्री म्हणाले की ठीक आहे. मुख्य रस्त्यावर पोलीस ठाणे आणि त्यामागे पोलीस वसाहत बांधता येईल. त्यानंतर कन्सल्टंट नेमून निविदा काढण्यात आली. यामध्ये 60 निविदा आल्या होत्या. त्यातील एव्हर स्माइल कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. ने घरं बांधून देण्याचा प्रस्ताव दिला होता. शासनानेही त्यास मान्यता दिली, असं बंड म्हणाले.

त्यावेळी सत्यपाल सिंह हे तत्कालीन पोलीस आयुक्त होते. बदलीनंतर मीरा बोरवणकर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. त्यावेळी काम झाले असते तर पोलिसांना घर मिळाली असती. मात्र, अद्याप घर मिळाली नाहीत, असं ते म्हणाले.

Tags

follow us