कंत्राटी भरतीमुळे कायदा-सुव्यवस्था कशी राहील ? शरद पवारांचा सरकारला सवाल
मुंबई : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. गृहखाते मी सांभाळले आहे. पोलिसांची (Police) ड्युटी महत्त्वाची आहे. कंत्राटी पोलिस घेतल्यानंतर अकरा महिन्यात सगळ्या गोष्टी होत नाही. कंत्राटी भरतीमुळे कायदा-सुव्यवस्था कशी राहील, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. कंत्राटी पद्धतीने भरती हे चुकीचे काम भाजपने देशात चालविले असल्याचा आरोपही पवारांनी केला आहे.
शरद पवार म्हणाले, पोलिसांना गर्दीचे नियंत्रण करावे लागते. कायद्याचे ज्ञान लागते. सगळ्या गोष्टी अकरा महिन्यांमध्ये होत नाहीत. अकरा महिन्याची सेवा केल्यानंतर त्या व्यक्तीने करायचे काय ? हा प्रश्न आहे. पण पोलिसांमधील कंत्राटी भरती कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे. कंत्राटी भरतीमध्ये एससी, एसटी, ओबीसी, महिलांना आरक्षण मिळत नाही. हे समाजाच्या हिताचे नाही. उलट कंत्राटी पद्धतीमुळे कामावर मोठा परिणाम होतो.
भाजपसोबत जाण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून शरद पवारांच्या दारात बसायचे…
शिक्षण क्षेत्रातील खासगीकरणाबाबत पवार म्हणाले; सध्या शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरू आहे. तसेच शाळाही बंद करण्यात येत आहेत. तसेच शाळेमध्ये वीसपेक्षा कमी मुले असतील तर तो वर्ग बंद केला जातो. त्यातून शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळत नाही. तसेच खासगी संस्थांना शाळा दत्तक दिल्या जात नाहीत. नाशिकमध्ये मद्य कंपनीने दत्तक घेतलेल्या शाळेतच विद्यार्थ्यांसमोर गौतमी पाटीलचा डान्स ठेवला होता. मुलांनी काय शिकावे, शिक्षणांचे खासगीकरण झाल्यास गरजू मुलांनी शिकायचे कसे, असा सवालही पवारांनी उपस्थित केलाय.
2 बीएचके घर, 400 रुपयांत सिलिंडर, 5 लाखांचा विमा… जाहीरनाम्यात BRS चा आश्वासनांचा पाऊस
स्वतः गृहमंत्र्यांनी विधिमंडळात राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिला, मुलींची आकडेवारी जाहीर केली आहे. महिलांचे संरक्षण होत नाही, असे यातून दिसत असल्याचे पवार म्हणाले.
केंद्राकडून सत्तेचा गैरवापर : पवार
पोलिसांचा वापर करून दिल्लीमध्ये पत्रकारांवर धाडी टाकल्या जात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी धाडी टाकूनही काही मिळालेले नाही. केजरीवाल यांच्या सरकारमधील दोन-तीन मंत्री जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे, यांच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.