भाजपसोबत जाण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून शरद पवारांच्या दारात बसायचे…

भाजपसोबत जाण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून शरद पवारांच्या दारात बसायचे…

Jitendra Awad on Ajit Pawar : पहिल्यापासून शरद पवार (Sharad Pawar) यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रयत्न केला जातो. असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून केला जातो. यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की कारण नसताना पत्रकार परिषदेत म्हणतात की शरद पवारचं म्हटले भाजपसोबत जायचं पण ते करणार काय होते? रोज सकाळी सात वाजता त्यांच्या घरी जाऊन बसायचे, साहेब चला, साहेब चला.. मग त्यावेळी तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देणार होते? यातील काही खोटं असेल तर पत्रकार परिषदेत सांगा, असे जाहीर आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला दिले आहे.

दिल्लीत निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. समोरच्या बाजूचे वकील बोलत होते. त्यावेळी 84 वर्षाचे शरद पवार एका खुर्चीवर बसून होते. मी जन्म दिलेल्या पक्षाचा कोणीतरी गळा घोटतंय, मला ही लढाई लढली पाहिजे, ही लढाई वकिलांवर सोडून चालणार नाही. मला तिथं उपस्थित राहिलं पाहिजे, या भावनेतून ते आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहिले, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तुम्ही पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करत असाल तर आम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

ते पुढं म्हणाले, शरद पवारांकडे बघून वकील म्हणाला की ह्यांनी पक्ष कधी लोकशाही मार्गाने चालवला नाही, हे स्वत:ला संस्थानिक समजतात, ह्यांना लोकशाहीची ओळखच नाही. साडेआठरा वर्षे मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर ह्यांची हिंमत कशी झाली? फार मेहनत घेत नव्हते, शरद पवार यांच्या सभांमुळे निवडणून यायचे, मंत्रिपदांचे वाटप व्हायचे. सगळं केल्यानंतर हे ऐकायला भेटणं किती दुर्दैवं आहे.

स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संघ कुठे होता? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

महिला आरक्षणावर पंतप्रधान दिल्लीत सांगतात की हे पहिल्यांदा झाले आहे. पण शरद पवारांनी फार वर्षापूर्वी केलं. 30 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण नेलं. आर्मी, पायलट, नेव्ही, एअर फोर्समध्ये आरक्षण हे फक्त शरद पवार यांनी आणलं. मीच पहिल्यांदा करतोय असं म्हणू नका. यांनी पायंडा पाडून दिला आहे. तुम्ही फार उशीर चालायला शिकलात. शरद पवार यांनी 1993 मध्ये केलं तर नरेंद्र मोदींनी 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना करायला हवं होतं. त्यांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की जातीय जणगणना झाली पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube