स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संघ कुठे होता? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. इंडिया आघाडीच्या धर्तीवर ते राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या संघटनांची मोर्चेबांधणी करत आहेत. आज उबाठा आणि समाजवादी पक्षाची युती झाली. या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. दुसऱ्या कोणाला मोठे होऊ द्यायचे नाही ही भाजपची वृत्ती आहे, अशी टीका त्यांनी केली.
भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेलेल्या उर्वशीचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला
ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही आणि कोणी मोठं होत असेल तर त्यांच्यासोबत जाऊन त्याची विल्हेवाट लावायची आणि आपण मोठं व्हायचं, ही भाजपची कुट नीती आहे. आता नितीश कुमार- लालू एकत्र आले, पण आधी त्यांचं सरकार भाजपनेचं पाडलं. अनेक राज्यातील सरकारं भाजपने पाडली. या विघ्न संतोषीवृत्तीच्या विरोधात आता सगळ्यांनी एकत्र लढलं पाहीजे, असं ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले, आम्ही 20-25 वर्षे एकत्र होतो. मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती एकत्र आली होती, तेव्हा त्यात जनसंघ घुसला होता. त्यांना घुसण्याची सवयच आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला. काही जागांवर निवडणुक लढता येईल का, याचा विचार करून जनसंघ संयुक्त महाराष्ट्राच्या समितीत सहभागी झाला होता, पण, स्वातंत्र्य आंदोलन झाले, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन झाले तेव्हा संघ कुठे होता, असा सवाल उपस्थित केला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, मी घरात बसून काम केलं अशी टीका माझ्यावर होते. मी कोरोनात सांगायचो, मास्क घाला, अंतर राखा. आताही मी भाजपवाल्यांपासून अंतरच राखतो…. आता भाजपवालेच विरोधकांच्या, पत्रकारांच्या तोंडाला पट्ट्या लावत आहेत. विऱोधकांचा आवाज दाबण्याचं काम भाजप करतेय, अशी टीका त्यांनी केला.
ते म्हणाले, आता नेता निवडतांना विचार करून निवडा. कारण, आपण मत देतो, पण कुणाच्या तरी हातात देशाचं भविष्य देत असतो. भाजपला मत दिलं म्हणून कोणीतरी आपलं बोटचं कापलं, इतका देशातील जनतेचा भ्रमनिरास झालाय, अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.
या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आचार्य अत्रे आम्हाला नेहमीच मोठे आहेत, असं सांगण्यात आलं. अत्रे आणि ठाकरे यांच्यात वाद सुरू होता. पण, आमच्या घरात कदीही आम्हाला अत्रे वाईट असं सांगण्यात आलं नाही. त्यांचा मोठेपणा सांगितला जायचा. मात्र, आज विरोधकांना टार्गेट केलं जातं, असा आरोप ठाकरेंनी केला.