मोठी बातमी! महायुतीचा मुंबई महापालिकेसाठी मोठा निर्णय; राज्यभरात युती करण्यासंदर्भातही झाला निर्णय
गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेला खल अखेर संपून मुंबई महनगर पालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याची बातमी समोर आली आहे.

राज्याच्या विधानसभेत मोठ यश मिळाल्यानंतर आता महायुतीचं लक्ष मुंबई महानगर पालिकेकडे आहे. (Mumbai) कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंच वर्चस्व बाजूला करून सत्ता मिळवायची असा चंगच जणू भाजपने केला आहे. याच बाबत आता महायुतीतून मोठी बातमी समोर येत आहे.
गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेला खल अखेर संपून मुंबई महनगर पालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर राज्यातही काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा महायुतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्वतंत्र लढले तरी निवडणुकीनंतर त्या त्या ठिकाणी पुन्हा एकत्र येणार असं ठरल्याचीही सुत्रांची माहिती आहे.
राज ठाकरे यांनी मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासाव्या; निलेश राणेंकडून वर्मी घाव
महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असा दावा करण्यात येत आहे, परंतु दुसरीकडे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून मात्र स्वबळाचा नारा दिला जात असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती होणार की तीनही पक्ष स्वबळावर लढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढता येईल का? याची चाचपणी होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे.
विरोधकांना जिथं फायदा, तिथं महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार, असंही फडणवीस म्हणाले आहेत.दरम्यान, महाविकास आघाडीचा देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीये. तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राज ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत जाणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.