…तर आम्हाला राजसत्ता उलथवून लावायला वेळ लागणार नाही; धर्मानंद महाराजांच्या वक्तव्यानं खळबळ
धर्मगुरू धर्मानंद महाराज यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

धर्मगुरू धर्मानंद महाराज यांनी दादर येथील एका धर्मसभेमध्ये बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Dadar) त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाची शक्यता निर्माण झाली आहे.धर्मानंद महाराजांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करताना, धर्मगुरूंनी देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताप्राप्तीचं श्रेय स्वतःकडं घेतलं. आम्ही धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला, म्हणूनच देवेंद्र फडणवीस सत्तेत आले असं ते म्हणाले आहेत.
त्याचबरोबर राज्याच्या सत्तेवरही थेट भाष्य केलं आहे. राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा स्पष्ट इशारा धर्मानंद महाराजांनी दिला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे एक निवेदन सादर करणार असल्याचंही सांगितलं. ही वक्तव्ये दादरमधील कबुतरखान्याजवळील धर्मसभेत करण्यात आली असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजजीवनात नव्या चर्चेला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
फडणवीस सरकारला वठणीवर आणणारच! हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश