बाप बदलला की, विचार बदलत नाही; दक्षिण मुंबईतील आंदोलन बंदीच्या देवरांच्या पत्रावर मराठी एकीकरण समिती संतप्त

Marathi Ekikaran Committee on Milind Deora : राज्यसभेतील खासदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी आंदोलनांचे ठिकाण दक्षिण मुंबईऐवजी इतरत्र हलवण्याची सूचना केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे ( Marathi Ekikaran Committee ) प्रमुख दीपक पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
टीम इंडियापासून दुरावलेला ‘अमित’ थकला; तीन हॅट्रिक घेणाऱ्या फिरकीपटूचा क्रिकेटला गुडबाय
मोठ्या आंदोलनांमुळे नागरिकांच्या जीवनात व्यत्यय
देवरांनी म्हटले आहे की, दक्षिण मुंबई हे राज्याच्या शासन, सुरक्षा आणि अर्थकारणाचे केंद्र असून, येथे मुख्यमंत्री सचिवालय (मंत्रालय), विधीमंडळ, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, पोलिस दलाची कार्यालये तसेच वेस्टर्न नेव्हल कमांड यांसारख्या महत्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो आणि शासन, सुरक्षा तसेच खासगी क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम होतो. म्हणूनच अशा आंदोलनांना इतर ठिकाणी हलवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.
मंत्री सावेंच्या मध्यस्थीला यश! 12 मागण्या मान्य झाल्यानंतर नागपूरमधील ओबीसींचं साखळी उपोषण मागे
बाप बदलला की, विचार बदलतात असं नाही
तथापि, या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे, “बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे.” देवरांच्या पत्रामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली असून, आंदोलने हा लोकशाही हक्क असून त्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालणे योग्य ठरणार नाही, असे मराठी संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवारांचा दावा
यावर बोलताना रोहित पवार यांनी दावा केला आहे की, मिलिंद देवरा हे मोठ्या कुटुंबातून येतात त्यांना सर्वसामान्यांच्या घरात काय चालतं हे माहित नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या मदतीने मुख्यमंत्री ,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कपडे काढत आहेत.