तुम्ही पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करत असाल तर आम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
मुंबई : भारताविरुध्द खेळण्यासाठी पाकिस्तानी संघ गुजरामध्ये पोहोचला तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात आले होते. पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. तुम्ही पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करू शकता, मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी केला.
2 बीएचके घर, 400 रुपयांत सिलिंडर, 5 लाखांचा विमा… जाहीरनाम्यात BRS चा आश्वासनांचा पाऊस
आज उध्दव ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची युती झाली आहे. वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली. यावेळी त्यांनी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, पहिली पोटनिवडणुक आम्ही जिंकलो तेव्हा भाजप हिंदुत्वाच्या नात्याने आमच्यासोबत आली. पण जे सत्ता नसतानाही एकत्र येतात ते चिरकाल टिकतात. मी आहे समाजवादी पक्षासोबत. यामध्ये तुमच्या पोटात दुखण्यचां कारण काय? असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले, या पक्षात मुस्लिमही आहेत. पण ते देशभक्त आहेत, देशावर प्रेम करणारे आहेत. तुम्ही गुजरातमधील नरेंद्र स्टेडियमवर पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करू शकता, मग आम्ही शिवसेना म्हणून समाजवादी पक्षासोबत आलो तर काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी केला.
लढाई ही विचारांशी असते, माणसांशी नााही, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आता आम्ही सजावाद्यांसोबत आलो, तर आमच्यावर टीका केली जाईल. पण, समाजवादीतले लोक काय देशाबाहेरून आले आहेत का? आमचे मतभेद आहेत, पण तुम्हाला गाडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो, असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले की, महात्मा फुलेंची पगडी घालण्यासाठी मोठे तितकं मोठं डोकं लागतं, मी तितका मोठा नाही. त्यामुळं मी त्यांना म्हटलं की, ती माझ्या हातात द्या. मी मुख्यमंत्री असतांना लाडका होता, पण आता कोणीही मला लाडके माजी मुख्यमंत्री म्हणत नाही, अशी मिश्कील टीप्पण त्यांनी केली.