पुणे : कल्याणीनगर (Pune Accident) परिसरात घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा दावा करत ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. संबंधित मुलगा अपघातावेळी दारु प्यायला होता की नव्हता याबाबतचा उलगडा या रिपोर्टमधून होणार होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मेडिकल टेस्टला नेले असता तिथे ब्लड स्मँपल बदलण्यात आले असा ठपका या दोन्ही डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे. (doctor who changed the report in the Pune accident case has been arrested.)
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 19 तारखेला अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट आले, ते दुसऱ्याचे ब्लड स्मॅपलचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते कोणाचे आहेत याचा तपास सुरु आहे. या प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्यात फेकून देण्यात आले आणि दुसऱ्या ब्लड स्मॅपलला अल्पवयीन तरुणाचे नाव वापरले. त्यामुळे या प्रकरणात 304 सोबतच 120 ब अंतर्गत, 460, 213, 214 हे कलम लावण्यात आले आहेत. तसेच एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीहरी हरनोर यांनी रिपोर्ट बदलण्यासाठी तीन लाख रुपये घेतले होते.
डॉ.अजय तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक मेडिसीन अँन्ड टॉक्सिकोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉ. श्रीहरी हरनोर हे अपघात विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. संबंधित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रविवारी सकाळी नऊ वाजता ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर अकरा वाजता श्रीहरी हरलोल यांच्या विभागाने त्याचे ब्लड सँपल घेतले. या सॅम्पलमध्ये दारुचा अंश येऊ शकतो, हे लक्षात येताच ते बदलायचे ठरवले. त्यासाठी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले.
यानंतर चक्र फिरली. गेल्या काही दिवसांपासून रजेवर असलेले डॉ. अजय तावरे अॅक्टिव्ह झाले. तावरे यांनी ब्लड सॅम्पल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या एका रुग्णाचे ब्लड सॅम्पल टेस्टिंगसाठी देण्यात आले. तर संबंधित मुलाचे स्मॅम्पल हे थेट कचऱ्यात फेकून देण्यात आले. थोडक्यात अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हरनोर यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. पोलिसांनी या प्रकरणात खबरदारीचा उपाय म्हणून संध्याकाळी दुसऱ्या एका रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे दुसऱ्यांदा नमुने घेतले. त्याची DNA टेस्ट करायचे ठरवले आणि इथेच डॉक्टरांचे बिंग फुटले.
मात्र दुसऱ्या हॉस्पिटलमधून आलेल्या रिपोर्टमध्ये सुद्धा अल्पवयीन तरुण दारू प्यायला नव्हता, हे निष्पन्न झाले आहे. कारण रक्ताचे नमुने उशिरा गेले. पण आमची केस ही केवळ ब्लड रिपोर्टवरती अवलंबून नाही. आमच्याकडे संबंधित आरोपीचे दारु पितानाचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आहे. दारुचे बिल आहे. याशिवाय आता ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सँपल घेतले आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ससून हॉस्पिटलचे सगळे सीसीटिव्ही आम्ही तपासणार आहेत. विशाल अग्रवाल आणि तावरे याचे संपर्क झाल्याचे समोर आले आहे, असेही आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.