सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; आमदार अॅड. राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी

Rahul Kul: वाढदिवस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत काढत या विशेष दिवशी मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी दिली.

Donation To The Chief Minister's Relief Fund On The Occasion Of MLA Adv. Rahul Kul's Birthday

Donation To The Chief Minister's Relief Fund On The Occasion Of MLA Adv. Rahul Kul's Birthday

Donation to the Chief Minister’s Relief Fund: दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल कुल ( Rahul Kul) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अर्थपूर्ण उपक्रम राबविण्यात आलाय. वाढदिवस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत काढत या विशेष दिवशी मुख्यमंत्री सहायता निधीला (chief Minister’s Relief Fund) देणगी देऊन समाजसेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला. (Donation to the Chief Minister’s Relief Fund on the occasion of MLA Adv. Rahul Kul’s birthday )


शिवानी सुर्वेच्या सिनेमाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता! ‘या’ दिवशी भेटीला येणार ‘OLC : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’

या उपक्रमांतर्गत वाघोलीचे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखांची देणगी दिली आहे. तर तर महेंद्र भाडळे यांनी 51 हजार रुपये देऊन सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले. याचबरोबर संदीप सातव यांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना 200 दिवाळी किट वाटप करून दुःखाच्या काळातही आनंदाचा सण त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आला. हा उपक्रम केवळ आमदारांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम न राहता, सेवाभाव, मानवता आणि सामाजिक जाणीव यांचा संदेश देणारा उपक्रम ठरला आहे. दौंड परिसरात या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला प्रियदर्शिनी इंदलकर-नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

आमदार अॅड. राहुल कुल यावेळी म्हणाले, सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि लोकहिताची भावना हाच आमच्या कार्यशैलीचा मूलमंत्र आहे. जनतेच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी हेच कार्य पुढेही सुरू राहील. स्थानिक जनतेकडून, कार्यकर्त्यांकडून आणि सामाजिक संघटनांकडून या समाजोपयोगी उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहरे. दौंड मतदारसंघात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version