DPDC Meeting Pune : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यसभा खासदार म्हणून शरद पवारही (Sharad Pawar) सहभागी आहेत. विशेष म्हणजे शरद पवार बैठकीसाठी 5 मिनिटे आधीच सभागृहात आले. तर नंतर आलेल्या अजित पवारांनी दोन खुर्च्या सोडून बसणेच पसंत केलं. दरम्यान, या बैठकीत सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तर शरद पवार आणि अजित पवारांमध्येही चांगलीच जुंपली होती.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी दोन वाजता सुरू झाली. या बैठकीला खासदार तथा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीला सुनेत्रा पवार आणि मुरलीधर मोहोळ उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, या बैठकीत शरद पवारांनी बारामतीतील दुषित पाण्याचा प्रश्न उपस्थित केला.
हरियाणा विधानसभा निवडणूक; सुनीता केजरीवालांकडून मोठ्या घोषणा, ‘या’ पाच योजनांचं हमीपत्रं जारी
बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्यावर कारवाई करा, अशी मागणी पवारांनी केली. त्यांच्या या मागणीवर बोलतांना अजित पवार म्हणाले की, बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करत आहेत. त्यासंदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटीसा पाठवायला सांगितल्या आहेत. कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल, असं अजित पवार म्हणाले
या बैठकीत सुप्रिया सुळें आणि खासदार अमोल कोल्हेंनी लोकसभा सदस्यांना निधी न दिल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. बारामती आणि शिरूर लोकसभा क्षेत्रात विकास काम करण्यासठी निधी दिला जात नाही. आम्हाला न्याय मिळणार का? का फक्त मावळला निधी मिळणार? आम्ही काय फक्त बैठकीला यायचं का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला.
सुळेंच्या या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देण्यास टाळलं. मात्र, सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावरून आमदार सुनील शेळके चांगलेच संतप्त झाले. सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर बोलतांना शेळके म्हणाले, ताई आम्ही बारामती-बारामती करत नाहीत, तुम्ही सारखं मावळचा उल्लेख करत आहात, असं शेळके म्हणाले.