आम्हाला न्याय मिळणार का? की निधी फक्त मावळलाच जाणार? DPDC बैठकीत सुप्रिया सुळे-सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी

बारामती आणि शिरूर लोकसभा क्षेत्रात विकास काम करण्यासठी निधी दिला जात नाही. आम्हाला न्याय मिळणार का? -सुप्रिया सुळे

Supriya Sule 1

DPDC Meeting Pune : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत शरद पवारही सहभागी आहेत. त्याशिवाय, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे देखील बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी निधी वाटपावरून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. DPDC बैठकीत सुप्रिया सुळेसुनील शेळकेंमध्ये (Sunil Shelke) जोरदार खडाजंगी झाली.

हरियाणा विधानसभा निवडणूक; सुनीता केजरीवालांकडून मोठ्या घोषणा, ‘या’ पाच योजनांचं हमीपत्रं जारी 

शनिवारी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही आमनेसामने आले होते. या बैठकीत शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्याकडे लोकसभेत निधी न दिल्याची तक्रार केली. बारामती आणि शिरूर लोकसभा क्षेत्रात विकास काम करण्यासठी निधी दिला जात नाही. आम्हाला न्याय मिळणार का? का फक्त मावळला निधी मिळणार? आम्ही काय फक्त बैठकीला यायचं का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला.

Anil Kapoor: अनिल कपूरच्या बॉडीचं जेरेमी रेनरच्या रॉरी मिलिकिनकडून तोंडभरून कौतुक! 

सुळेंच्या या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देण्यास टाळलं. मात्र, सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावरून आमदार सुनील शेळके चांगलेच संतप्त झाले. सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर बोलतांना शेळके म्हणाले, ताई आम्ही बारामती-बारामती करत नाहीत, तुम्ही सारखं मावळचा उल्लेख करत आहात, असं शेळके म्हणाले.

पवारांचा अजितदादांना सवाल…
या बैठखीत बोलताना शरद पवार म्हणाले की, बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्यावर कारवाई करा, अशी मागणी पवारांनी केली. त्यांच्या या मागणीवर बोलतांना अजित पवार म्हणाले की, बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करत आहेत. त्यासंदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटीसा पाठवायला सांगितल्या आहेत. कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल, असं अजित पवार म्हणाले.

या बैठकीला अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, शरद पवार आदी उपस्थित होते. मात्र, सुनेत्रा पवार आणि मुरलीधर मोहोळ उपस्थित राहिले नाहीत.

follow us