Dr. Ajay Taware of Sassoon is Arrested; He was running a kidney racket by showing a fake family : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर समोर आलेल्या ससूनच्या डॉक्टर अजय तावरे यांना अखेर रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये अटक करण्यात आली आहे. तावरे यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने 2 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Dhananjay Munde : सगळ्या त्रासापासून वाचण्यासाठी धनंजय मुंडे नक्की गेलेत कुठे?
2022 मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी तब्बल पंधरा जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सद्या तावरे पोर्शे प्रकरणात, मागील वर्षभरापासून येरवडा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे. अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. लवकरच गुन्हे शाखा तावरेचा ताबा किडणी रॅकेटमध्ये घेणार आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या रॅकेट प्रकरणात नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधिशांच्या चौकशी समितेने तेव्हा डॉ. तावरे याचा सहभाग निश्चीत केला होता. तसा अहवालही सरकारकडं पाठविण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होताना तो रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय तज्ञ, दलाल, रुग्ण आणि दात्यावर दाखल झाला.
रॅकेटमध्ये होते तब्बल पंधरा आरोपी
किडनी रॅकेट प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंखे, दाता सारीका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ.परवेज ग्रँट, रेबेका जॉन (उप संचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ.अभय सद्रे, डॉ.भुपत भाटी,डॉ.हिमेश गांधी, समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ.संजोग सिताराम कदम यांनी तक्रार दिली होती.
83 विमानांपैकी एकही विमान पोहोचलेले नाही, संरक्षण करारावर आयएएफ चीफ मार्शल भडकले
प्रकार कसा आला समोर?
या दरम्यान संबंधित रूग्ण साळुंके याची खरी पत्नीही हॉस्पीटलमध्ये तीची विचारपूस करण्यासाठी येत-जात होती. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिका हिनं तिच्या बहिनीला एजंट रवीभाऊने पैसे दिले का? अशी विचारणा केली. त्यावर रवीभाऊने केवळ 4 लाख रूपये देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितलं. परंतु, ठरल्या प्रमाणे पंधरा लाख रूपये न मिळाल्याने त्यांच्यातील झालेला तोंडी व्यवहार फिस्कटला. त्यानंतर सारिका व नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. यानंतर खरे प्रकरण उघडकीस आले.
असा सापडला डॉ. तावरे जाळ्यात
किडनी रॅकेट प्रकरणात डॉ.तावरे हा एफआयआर मधून स्वत:चे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. मात्र पोर्शे कार प्रकरणात तो चांगलाच अडकला. दरम्यान, जुन्या गुन्हयांचे निर्गतीकरण करताना पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्हयातील समितीचा अहवाल वाचणात आला. त्यात डॉ. तावरेचे नाव असतानाही गुन्हा दाखल नसल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या पुन्हा मुळाशी जाऊन तपास केला. तेव्हा डॉ. तावरे याचीच प्रत्यारोपनात मुख्य भुमिका असल्याचं उघड झालं.
तावरेच्या नियंत्रणाखालीच काम
तावरे याला किडणी देणारे आणि किडणी घेणारे हे दोघेही बनावट आहेत हे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडणी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. रिजनल अॅथोराझेशन कमिटीचा तावरे अध्यक्ष होता. आठ सदस्यांची समीती तावरेच्या नियंत्रणाखालीच काम करत होती. जेव्हा किडणी रॅकेट राज्यात गाजले तेव्हा ससूनच्या या समीतीबाबत देखील संशय निर्माण झाला होता. तेव्हा राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली दहा लोकांची समीती कठीत केली होती. त्या समीतीने केलेल्या चौकशीत तावरेंचा हा प्रकार समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.