डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी येथे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये (DY) नोकरी व इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विभागप्रमुख, प्लेसमेंट सेल आणि प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाच्या गरजांनुसार सक्षम बनविण्यात येत आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि कौशल्याधारित भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये संकुलातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, पीजीडीएम तसेच पॉलिटेक्निक विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती व्होडाफोन, दीपक फर्टिलायझर्स, बीएनवाय मेलॉन, कॅपजेमिनी, फोर्स मोटर्स, विप्रो, डसॉल्ट सिस्टिम्स, गोदरेज, सुल्झर, किर्लोस्कर, बॉश, एचएसबीसी टेक्नॉलॉजी, इन्फोब्लॉक्स, आरटीकॅम्प, पॉलीकॅब आणि ह्युंदाई इंडिया यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
राम मंदिर देणगी प्रकरणावरून ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; 5 जुलैला दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार
गतवर्षी विद्यार्थ्यांनी २७ लाख वार्षिक (LPA) चे सर्वोच्च पॅकेज मिळवून घालून दिलेल्या उज्ज्वल परंपरेचा वारसा कायम राखत, यंदाही विद्यार्थ्यांनी सरासरी ६ ते १५ लाख वार्षिक (LPA) पॅकेज मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाच्या अपेक्षा आणि आधुनिक भरती प्रक्रियेची माहिती मिळावी तसेच प्लेसमेंटसाठी आवश्यक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने अभियांत्रिकी, एमबीए आणि पीजीडीएम विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एचआर सिम्पोजियम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजा, कौशल्याधारित भरती प्रक्रिया, करिअर नियोजन तसेच प्रभावी मुलाखत तंत्र याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्लेसमेंटकडे पाहण्याचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला.
अत्याधुनिक प्रयोगशाळा, जागतिक दर्जाच्या सुविधा, अनुभवी प्राध्यापक, माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुख इंटर्नशिप यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे.
या उल्लेखनीय यशासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, ट्रस्टी तेजस पाटील, कॅंपस संचालक रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), प्राचार्य, डीन प्लेसमेंट्स प्रा. जस्मिता कौर तसेच सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाचे पंख देत, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची उज्ज्वल परंपरा जपणारे संकुल म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी.
