आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी “रेग्युलेटरी अफेअर्स” विषयावरील राष्ट्रीय वेबिनार मालिकेला प्रतिसाद

D. Y. Patil College of Pharmacy : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) अंतर्गत आणि

D. Y. Patil College Of Pharmacy

D. Y. Patil College of Pharmacy : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) अंतर्गत आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (एपीटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने “रेग्युलेटरी अफेअर्स” या विषयावरील राष्ट्रीय वेबिनार मालिका यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. या वेबिनार मालिकेमध्ये फार्मास्युटिकल उद्योगातील विविध क्षेत्रांतील मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यामध्ये सायनोस हेल्थ मुंबईच्या डॉ. नमित कांबळे, जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड, पुणेचे सचिन गुंदेचा, बटाव्हिया फार्मा प्रा. लि. पुणेच्या प्रिया बोरा,  रेड्डीज लॅबोरेटरीज हैदराबादच्या स्मिता वाळझाडे, फ्रेयर सोल्यूशन्स हैदराबादचे अशोक आव्हाड, फ्रेयर सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रा. लि., हैदराबादच्या सुचेता पाटील, सिडलर रेमेडीज प्रा. लि. पुणेच्या वैशाली पोखरकर, जेव्हीएजी फार्मा कन्सल्टंट्स, पुणेच्या रेश्मा कुलकर्णी तसेच प्रुडेन्स डर्मास्युटिकल्स प्रा. लि. पुणेचे अमेय देव इत्यादी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

वेबिनार मालिकेत देशभरातील फार्मसी शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच औषध उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला. तज्ज्ञ वक्त्यांनी रेग्युलेटरी (नियामक) अफेअर्स, संशोधन, औषध नोंदणी प्रक्रिया, जागतिक नियामक आवश्यकता आणि फार्मास्युटिकल (औषध निर्माण) उद्योगातील करिअरच्या संधी यांसारख्या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यावहारे यांनी अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे आणि शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. तसेच फार्मास्युटिकल क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी अशा वेबिनार मालिकांचे महत्त्व अधोरेखित केले. या वेबिनार मालिकेचे नियोजन प्रा. पल्लवी गोसावी आणि प्रा. कल्याणी चांदे यांनी केले, तर सह-संयोजक डॉ. शिल्पा चौधरी यांनी मोलाचे योगदान दिले.

follow us