Accident on Pune-Solapur National Highway : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर सोलापुरवरून पुण्याकडं निघालेला मालवाहु कंटेनर मदनवाडी चौफुला (ता. इंदापुर) येथे शनिवारी (ता. १५) सकाळी सहाच्या सुमारास चालकाचा (Accident) कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे सुमारे वीस ते पंचवीस फुट उंचीच्या पुलावरुन खाली कोसळ्यामुळे झालेल्या अपघातामध्ये कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातांमध्ये कंटनेरचेही मोठे नुकसान झाले.
श्रवणकुमार भगवतीप्रसाद यादव (वय-३७, रा. हल्ली मूंबई, मुळ उत्तरप्रदेश) असे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलली माहिती अशीः शनिवारी (ता. १५) सकाळी सहाच्या सुमारास मदनवाडी चौफुला (ता. इंदापुर) येथे सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे निघालेल्या कंटेनर येथील पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट वीस ते पंचवीस फुट खाली सेवा रस्त्यावर कोसळला.
धक्कादायक! तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
अपघातांमध्ये कंटेनर चालक श्रवणकुमार यादव गंभीर जखमी झाला होता. त्यास येथील खासगी रुग्नालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. कंटेनर कोसळलेल्या ठिकाणी नेहमी लोकांची वर्दळ असते. अपघात सकाळच्या वेळी झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान सदर अपघाताचे स्वरुप विचारात घेऊ मदनवाडी चौफुला व भिगवण बस स्थानकाजवळील उड्डाणपुलावर योग्य ती सुरक्षा व्यवस्था करावी अशा मागणी स्थानिक नागरिकांमधुन होत आहे. अपघाताबाबतचा अधिक तपास य़ेथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री. लोडी करीत आहेत.