धक्कादायक! तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. मयत पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने युवक बुडाल्याचे सांगितले जात आहे. घटना कशामुळे घडली याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे समोर आली आहेत. जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे अशी युवकांची नावे आहेत. पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी या गावातील आहेत. या युवकांच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोककळा पसरली आहे. नागरिकांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यवतमाळच्या वणी शहरात मनसेची राज गर्जना; चंद्रपूर पाठोपाठ वणी विधानसभेचाही उमेदवार ठरला
घोडाझरी तलाव हा घोडाझरी धरणाचाच एक भाग आहे. 1923 मध्ये गोराझरी नदीवर हा तलाव बांधण्यात आला आहे. सिंचन प्रकल्पाचा भाग म्हणून या तलावाचे बांधकाम करण्यात आले होते. घोडाझरी वन्यजीव अभयारण्यासाठी देखील ओळखले जाते. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीचे आहे. या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या ठिकाणी स्थलांतरीत पक्षी येत असतात. या सर्व गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात.
तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेले युवक देखील पर्यटनासाठीच या ठिकाणी आलेले असावेत अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. आता या युवकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातूनच मिळणार आहे.
मनसेचे आणखी दोन भिडू मैदानात; चंद्रपूर, राजुरा मतदारसंघात उमेदवार ठरले!